रानभाजी अन् नाचणीच्या भाकरीचा नैवेद्य

By admin | Published: September 7, 2016 02:29 AM2016-09-07T02:29:43+5:302016-09-07T02:29:43+5:30

गणेश उत्सवाला तलासरी भागात उत्सहाने सुरु वात झाली असून शहरीभागा सारखा तलासरी भागात खर्चिक देखावे नसले तरी आप आपल्या परीने चांगले

Nirvaida of rajbhaji and rice bread | रानभाजी अन् नाचणीच्या भाकरीचा नैवेद्य

रानभाजी अन् नाचणीच्या भाकरीचा नैवेद्य

Next

सुरेश काटे, तलासरी
गणेश उत्सवाला तलासरी भागात उत्सहाने सुरु वात झाली असून शहरीभागा सारखा तलासरी भागात खर्चिक देखावे नसले तरी आप आपल्या परीने चांगले देखावे या भागातील आदिवासी तरुणांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक व सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्याचा भर अधिक आहे. खर्चिक मोदका पेक्षा आदिवासीं भाविकांनी श्रद्धेने दाखविलेल्या डाळ भात नाचणीची भाकरी व रानभाजीच्या नैवेद्यावर येथील बाप्पा त्रुप्त होत आहे.
तलासरी पोलीस स्टेशनच्या दप्तरी एकशे नव्वद गणेश स्थापनेची नोंद करण्यात आली आहे. या मध्ये १४० सार्वजनिक तर ४९ खाजगी गणपती बसविण्यात आले आहेत. दीड दिवसाचे सार्वजनिक १५, खाजगी २५, तीन दिवसाचे सार्वजनिक ७५, खाजगी १२, पाच दिवसाचे सार्वजनिक ३२ , खाजगी १०, सात दिवसाचे सार्वजनिक १२, खाजगी १, दहा दिवसाचे सार्वजनिक ७ असे असून आदिवासी तरुणांनी स्थापन केलेल्या मंडळाकडून आपापल्या परीने गणेश उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
शहरीभागा प्रमाणे तालुक्यामध्ये श्रीमंती थाटात बाप्पाची भक्ती होत नसली तरी नाचणीची भाकरी आणि रानभाज्याचा नैवेद्या बाप्पाला भावत असल्याचे रघु किरकीरा आणि रमेश तुंबडा यांनी सांगितले.

Web Title: Nirvaida of rajbhaji and rice bread

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.