वातानुकूलित शिवशाही स्लीपर नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 10:47 PM2018-10-29T22:47:57+5:302018-10-29T22:49:30+5:30
वातानुकूलित शिवशाही स्लिपर कोच सेवा तात्काळ रद्द करून निमआराम बसची सेवा सुरु करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांची केली आहे.
बोईसर : बोईसर एस. टी. आगारातून बोईसर ते कोल्हापूर शिवशाही सिटींंग बसची सुरळीत चाललेली सेवा अचानक बंद करून त्या मार्गावर दि . २४ आॅक्टोबरपासून सुरु केलेली वातानुकूलित शिवशाही स्लिपर कोच सेवा तात्काळ रद्द करून निमआराम बसची सेवा सुरु करण्याची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालघर जिल्हा पदाधिकाऱ्यांची केली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पालघर जिल्हा उपाध्यक्ष तेजस पवार व पालघर जिल्हा सरचिटणीस वैभव जाधव यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पालघर नियंत्रण विभागाला दिलेल्या निवेदनात मुळातच सुरु असलेल्या शिवशाही बसचे भाडे जास्त असल्यामुळे ते सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नव्हतेच त्यात आता महागडे व जास्त भाडे असलेली स्लीपर कोचसेवा सुरु केल्याने ते परवडणारे नसल्याचे सांगून पूर्वी १५ वर्षांपासून नियमीत सुरु असलेली बोईसर ते कोल्हापूर निम आराम बसची सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आली. नव्याने सुरु केलेल्या बस सेवेच्या सर्वसामान्यना फटका बसत असून त्वरित निमआराम बसची सेवा सुरु असे निवेदन परिवहन मंत्र्यांनाही दिले आहे.