तीन महिन्यापासून पुस्तकेच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:59 PM2019-08-28T23:59:42+5:302019-08-28T23:59:46+5:30
भयानक वास्तव : पुस्तके मिळणार कधी?, अभ्यास होणार कधी?
मनोर : पालघर तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्यांना तीन महिने उलटले तरी प्रकल विभागाच्या शिक्षण खात्याकडून पुस्तके मिळालेली नाहीत त्यामुळे त्या आदिवासी मुलांची मोठी कुचंबणा झाली आहे. त्याला जबाबदार असणाºया अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
आदिवासी प्रकल्प डहाणू अंतर्गत येणाºया मेंढवण आश्रमशाळेत इयत्ता नववीत शिक्षण घेणाºया आदिवासी मुलांना शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी पुस्तके मिळाली नाहीत. त्यामुळे ते अभ्यास काय करणार व येणाºया परीक्षेत काय लिहिणार? त्यामुळे त्यांचे हे शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याची वेळ आली आहे. मुलांचे पालक सध्या चिंतेत असून मेंढवण ग्रामदान मंडळचे अध्यक्ष बिस्तुर कुवर म्हणाले की, आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना वाºयावर सोडल्यासारखे झाले आहे.
प्रकल्प अधिकारी कटियार नॉट रिचेबल?
इयत्ता नववीमध्ये एकूण मोठी पट संख्या आहे. त्यांना तीन महिन्यापासून पुस्तके मिळाली नाही. हे सर्व आदिवासी डहाणू प्रकल्प अधिकाºयांचा मनमानीमुळे घडले आहे. डहाणूचे आदिवासी प्रकल्प अधिकारी डहाणू सौरभ कटियार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया जाणून घेता आली नाही.