३१ मार्चनंतर बीएस- ४ वाहनांची नोंदणी होणार नाही, न्यायालयाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 12:17 AM2020-03-18T00:17:11+5:302020-03-18T00:17:39+5:30

भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत.

No BS-4 vehicles will be registered after March31, court directs | ३१ मार्चनंतर बीएस- ४ वाहनांची नोंदणी होणार नाही, न्यायालयाचे निर्देश

३१ मार्चनंतर बीएस- ४ वाहनांची नोंदणी होणार नाही, न्यायालयाचे निर्देश

Next

वसई/नालासोपारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये भारतामध्ये सध्या वाहन नोंदणी करण्यासाठी प्रदूषण मानके बीएस- ४ सुरू आहेत. ही मानके (वाहन नोंदणी) ३१ मार्चनंतर बंद केली जाणार आहेत. यानंतर जरी वाहनाचे शुल्क, कर भरले असतील व इन्स्पेक्शन झाले असेल तरी देखील अशा वाहनांची नोंदणी केली जाणार नाही. याची वाहनधारकांनी व वाहन वितरकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ज्या वितरकांकडून अथवा वाहनधारकांकडून बीएस-४ वाहन काही कारणात्सव नोंदणी करण्याचे राहून गेले असेल, वित्तदात्याकडील (बँक) थकीत प्रकरणे, मालकाचे आजारपण, वाहन मालकांचा अपघात इत्यादी कारणांमुळे वाहन नोंदणी राहिली असेल तर ती नोंदणी २० मार्चपूर्वी पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर संगणकीय वाहन प्रणालीवर कोणत्याही परिस्थितीत ३१ मार्चनंतर बीएस-६ मानकांच्या नोंदणी करता येणार आहे. गुढीपाडव्यासाठी वाहन खरेदी करण्यासाठी इच्छुकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, २५ मार्चला गुढीपाडवा आहे. तत्पूर्वी किमान ६ ते ७ दिवस अगोदर आपण आपल्या वाहनाची पूर्तता जसे की शुल्क, कर इत्यादी भरणे पूर्ण करून घ्यावी. जेणेकरून एचएसआरपी नंबर प्लेट बसवून वितरक आपणाला वाहन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वाहन डिलिव्हरी देऊ शकेल.

२० मार्चपूर्वी नोंदणी व्हावी
वाहन वितरक व वाहन मालक यांच्या बीएस- ४ मानकांच्या वाहनांच्या नोंदणी अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी व आपल्या वाहनाची नोंदणी प्रक्रि या २० मार्चपूर्वीच पूर्ण करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.

Web Title: No BS-4 vehicles will be registered after March31, court directs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.