CoronaVirus News: दिलासादायक! मुंबईजवळच्या 'या' शहरात आज एकही कोरोना मृत्यू नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 10:48 PM2020-07-19T22:48:58+5:302020-07-19T22:50:35+5:30
बाधित रुग्णांचा आकडा 10 हजारांकडे; आज 251 जणांची नोंद
- आशिष राणे, वसई
वसई-विरार शहरात आज एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने ही बाब अत्यंत दिलासादायक ठरली आहे. मात्र रविवारी बाधितांची संख्या 251 वर पोहचली आहे. तर पालिका हद्दीतील 121 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
वसई विरार शहरात रविवारी एकाही रुग्णाचा मृत्यू न झाल्याने ही बाब दिलासादायक ठरली असली तरी आजपर्यंत पालिका हद्दीत एकूण 189 रूग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. तसेच पालिका हद्दीत आजवर एकूण बाधित रुग्णाची संख्या 9827 वर पोहचली आहे. त्यासोबत शहरात एकूण 3177 रूग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यामध्ये वसई 66 रुग्ण, नायगाव 25 रुग्ण, वसई-विरार 14 रुग्ण, नालासोपारा 90 रुग्ण आणि विरार 56 रुग्णांचा समावेश आहे. रुग्णांमध्ये 141 पुरुष व 110 महिलांचा अंतर्भाव आहे.
दिलासा कमी, पण आज 121 रूग्ण झाले कोरोना मुक्त
वसई विरार शहरात आज 121 रूग्ण विविध रुग्णालयांतून घरी परतले. मात्र कोणते रुग्ण कुठल्या रुग्णालय व परिसरातून मुक्त करण्यात आले याची माहिती पालिकेकडून उपलब्ध झालेली नाही तरीही आजवर मुक्त रुग्णांची एकूण संख्या 6461 वर पोहचली आहे.