रिक्षातून अतिरिक्त प्रवासी वाहतूक नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 12:55 AM2019-09-28T00:55:58+5:302019-09-28T00:56:03+5:30

पालघर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची माहिती; रस्त्यावरील पार्किंगवरही कारवाई होणार

No extra passenger traffic from the space | रिक्षातून अतिरिक्त प्रवासी वाहतूक नाही

रिक्षातून अतिरिक्त प्रवासी वाहतूक नाही

Next

पालघर : शहरातील विस्कळीत झालेल्या वाहतूक व्यवस्थेला ताळ्यावर आणण्यासाठी या पुढे तीन आणि सहा आसनी रिक्षांमधून अतिरिक्त प्रवासी वाहतूक बंद करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सात अधिकृत रिक्षा स्टॅण्डवर केवळ पाच रिक्षा ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांनी बैठकीत दिली.

जिल्हा निर्मितीनंतर पाच वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही पालघर शहरातील बेशिस्त बनत चाललेल्या वाहतूक व्यवस्थेमुळे शहराला दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. जिल्हा निर्मितीनंतर तरी या समस्या कमी होतील, अशी आशा होती. मात्र, अतिक्रमण हटाव, रस्ते रुंदीकरण, सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिसांचे नियंत्रण आदी वाहतूक नियंत्रणासाठी अत्यावश्यक बाबींकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील अतिक्रमणाने रौद्ररूप धारण केले. यावर उपाययोजना आखण्याच्या दृष्टीने नगरपरिषदेत उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवक, राज्य परिवहन (एस.टी.) विभाग, विद्युत वितरण, बांधकाम विभाग, रिक्षा-टेम्पो संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, रेल्वेचे अधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते.

शहरातील वाहतूक कोंडीला आळा घालण्याच्या दृष्टीने उपाय योजना म्हणून अधिकारी नाईक यांनी वाहतूक आराखड्याबाबत बनविलेला नकाशा बैठकीत सादर केला. यात एकेरी वाहतूक, अवजड वाहनांना बंदी, मच्छीमार्केटचे स्थलांतर, गाड्या पार्र्किंग व्यवस्था आदीबाबत उपस्थितांशी चर्चा केली. रिक्षाधारकाची संख्या १५०० पर्यंत पोहोचल्याने या बेछूट तर काही विनापरवाना वाढलेल्या रिक्षाधारकांना आवरण्याची तसदी कुठल्याही विभागाकडून घेतली जात नसल्याने शहरात फक्त सात रिक्षा स्टॅण्डवर पाच रिक्षा उभ्या ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याचे घोषित केले. या निर्णयावर काही रिक्षाधारकांच्या काही संघटनांनी आक्षेप घेतला. त्यावर आता तीन व सहा आसनी रिक्षांना दिलेल्या परवानगीपेक्षा अतिरिक्त प्रवासी बसवता येणार नाही, असे सांगून त्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याची घोषणा केली. मात्र शहरातील कोंडीला जास्त प्रमाणात कारणीभूत असलेल्या रिक्षाधारकांकडून पुरविल्या जाणाºया आर्थिक रसदीमुळे हा कारवाईचा बडगा किती काळ टिकून राहतो, हे दिसणार आहे. रस्त्यारस्त्यावर खाद्य पदार्थांच्या हातगाड्या, फळ-भाजी विक्रेत्यांच्या गाड्या, दुचाकी - चार चाकी गाड्यांच्या रस्त्यावरील पार्र्किं ग यामुळेही शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याने यांच्या विरोधातील कारवाई किती काळ टिकून राहते यावर वाहतूक कोंडीच्या समस्यांचे फलित ठरणार आहे. यावेळी नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, उपनगराध्यक्ष उत्तम घरत उपस्थित होते.

पालघरमधील रस्त्याच्या कडेला असलेल्या मच्छी विक्र ेत्या व भाजीविक्रेत्यासाठी पालघर पूर्व भागात व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे मनोर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार असून त्यामुळे रस्ता मोकळा होणार असून पालघरवासियांनी आम्हाला सहकार्य करावे. - सुभाष पाटील,
बांधकाम सभापती

Web Title: No extra passenger traffic from the space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.