पैसै, गणवेश नाहीच, जि.प. शाळा सुरू होऊन झाले ६ महिने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 02:11 AM2017-11-20T02:11:14+5:302017-11-20T02:11:32+5:30

मोखाडा : होय मी लाभार्थी हे माझे सरकार अशी जाहीरातबाजी करून महाराष्ट्र सरकार आपली पाठ आपणच थोपटून घेत आहे.

No money, no uniform, zip School started 6 months | पैसै, गणवेश नाहीच, जि.प. शाळा सुरू होऊन झाले ६ महिने

पैसै, गणवेश नाहीच, जि.प. शाळा सुरू होऊन झाले ६ महिने

googlenewsNext

रविंद्र साळवे 
मोखाडा : होय मी लाभार्थी हे माझे सरकार अशी जाहीरातबाजी करून महाराष्ट्र सरकार आपली पाठ आपणच थोपटून घेत आहे. यावर सर्वत्र टीकेची झोड उठविली जात असतांनाच आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यातील जि.प. शाळांतील हजारो विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन ६ महिने झाले तरी गणवेश मिळालेले नाहीत.
त्यामुळे त्यांच्यावर ‘होय मी लाभार्थी’ माझे गणवेश सरकारने लटकवले असंच म्हणायची वेळ येऊन ठेपली आहे. तालुक्यात १५८ झेडपी शाळा असून जूनला सुरु झालेल्या शाळांनी १५ आॅगस्टपूर्वी गणवेशाची एक जोडी देण्याचा नियम आहे.
या वर्षी शासनाने पारदर्शक कारभाराचा गाजा-वाजा करून थेट पालक किंवा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु काही शाळांनी या निर्णयाला बासनात गुंडाळल्याने गणवेशाचा घोळ कायम आहे शासनाकडून प्रत्येकी एका गणवेशासाठी २०० रु प्रमाणे दोनचे ४०० रुपये दिले जाणार आहेत.
गणवेश घेतल्याची पावती संबधित शाळेकडे सुपूर्द केल्यानंतर हि रक्कम खात्यावर जमा केली जाणार असल्याचे बोलले जात आहे परंतु दिवसभराच्या मोल- मजूरीतून शंभर रुपये मिळत असल्याने दोन गणवेशासाठी ४०० रुपये कुठून आणायचे हा प्रश्न आदिवासी पालकांना सतावत आहे मागील वर्षी हा निधी शाळा समितीला दिला. निविदा मागवून कापड विक्रेता आणि टेलर यांची नियुक्ती केली होती. परंतु या मध्ये भ्रष्टचाराची शक्यता होती म्हणून सरकारने ही रक्कम पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला.
>४०० रुपये खात्यात अद्यापही जमा नाहीच
सरकारने हे ४०० रुपये पालक अथवा विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्याने अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम मिळाली नसल्याने पालकवर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत अधिक अधिक माहितीसाठी प्रभारी गटशिक्षण अधिकारी ए एस मोरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: No money, no uniform, zip School started 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.