नोंदणी नाही : २५ पैकी फक्त ६ बसेस रस्त्यावर

By admin | Published: October 28, 2015 11:07 PM2015-10-28T23:07:57+5:302015-10-29T01:34:19+5:30

स्थानिक प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेने सोमवारपासून (२६ आॅक्टोबर) २५ बसपैकी ६ बस अधिकृतपणे रस्त्यावर उतरविल्या असून उर्वरीत १९ बसची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी

No registration: Out of 25, only 6 buses are in the street | नोंदणी नाही : २५ पैकी फक्त ६ बसेस रस्त्यावर

नोंदणी नाही : २५ पैकी फक्त ६ बसेस रस्त्यावर

Next

भार्इंदर : स्थानिक प्रवाशांना समाधानकारक सेवा देण्यासाठी मीरा-भार्इंदर पालिकेने सोमवारपासून (२६ आॅक्टोबर) २५ बसपैकी ६ बस अधिकृतपणे रस्त्यावर उतरविल्या असून उर्वरीत १९ बसची प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी न झाल्याने त्या सेवेत दाखल होण्यासाठी एका आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
पालिकेने केंद्र शासनाच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत खाजगी-लोक सहभाग तत्वावरील स्थानिक परिवहन सेवा २०१० मध्ये सुरु केली आहे. रॉयल्टीच्या माध्यमातुन उत्पन्न देणाय््राा या सेवेसाठी प्रशासनाने केंद्राकडे २५० बसचा प्रस्ताव सादर केला होता. पहिल्या टप्प्यात ५० बस खरेदीला केंद्राने मंजुरी दिल्यानंतर त्याचा ठेका उल्हासनगरच्या मे. केस्ट्रल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिला. एका सधन महापालिकेने तांत्रिक दोष असलेल्या ५० बस मीरा-भार्इंदर पालिकेच्या माथी मारल्याने त्या बस काही महिन्यांतच नादुरुस्त होऊ लागल्या. त्यामुळे स्थानिक प्रवाशांत या सेवेविरोधात रोष व्यक्त करून सुसज्ज सेवेची मागणी केली. त्यावर प्रशासनाने २५ आॅक्टोबरपासून केंद्राने मंजूर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील १०० पैकी २५ बस सुरु करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याच २५ बसचे लोकार्पण २४ आॅक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केल्यानंतर यापैकी केवळ ६ बसच २६ आॅक्टोबरपासून रस्त्यावर उतरविल्या आहेत.
त्यांच्या आगारासाठी प्रशासनाने अद्याप जागा शोधली नसला तरी पार्कींगसाठी पाच जागांचा उतारा शोधला आहे. त्यातील केवळ प्लेझंट पार्क येथील जागा सध्या उपलब्ध झाल्याने २५ पैकी १९ बस नोंदणीअभावी सध्या तेथे उभ्या आहेत. सध्या दोन बस भार्इंदर ते उत्तन व चार बस भार्इंदर ते चौक मार्गावर सुरु केल्या असून त्या चालविण्यासाठी ५० कर्मचारी ठोक मानधनावर नियुक्त केल्याचे परिवहन विभागाचे प्रमुख अधिकारी कल्पिता वडे-पिंपळे यांनी सांगितले.

Web Title: No registration: Out of 25, only 6 buses are in the street

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.