वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 12:29 AM2019-06-28T00:29:04+5:302019-06-28T00:29:27+5:30

वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही.

No salary for 122 engineers from last 2 months | वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी

वसई-विरार महानगरपालिकेत अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी

googlenewsNext

नालासोपारा - वसई विरार महानगरपालिकेत ठेका पद्धतीने नियुक्त असलेल्या बांधकाम, पाणीपुरवठा आणि विद्युत विभागातील १२२ इंजिनियर्सना गेल्या दोन महिन्यापासून पगारच मिळालेला नाही. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना पगार मात्र इंजिनियरांना पगार नसल्याने अधिकारी तुपाशी तर इंजिनियर उपाशी अशी स्थिती आहे.

वसई विरार महानगरपालिकेत कल्याण येथील विशाल एक्स्पर्टाईज याला बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत विभागात इंजिनियर पुरवण्याचा ठेका दिलेला असून विविध विभागात एकूण त्याने १२२ इंजिनियर पुरवले असून सध्या ते कार्यरत आहेत. याच ठेकेदाराला घरपट्टी विभागातील वसुली करण्याचाही ठेका दिल्याचेही कळते. जे इंजिनियर महानगरपालिकेला पुरवले आहेत ते स्थानिक रहिवासी असून त्यात काही जणांनी बीई केलेले आहे तर काहींनी डिप्लोमा केलेला आहे. दोघांनाही दुजाभाव न देता समान पगार दिला जात आहे. या इंजिनियरांचा २५ ते २५ तारखेप्रमाणे महिना पकडला जातो आणि ५ ते १० तारखेपर्यंत त्यांचा पगार होणे आवश्यक असते. पण मे आणि जून महिन्यांचा अद्याप पगार झालेला नाही तर एप्रिल महिन्याचा पगार १० दिवसांपूर्वी झाल्याचेही कळते. पगारासाठी इंजिनियरांना दर महिन्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होते. कामे तर जास्त प्रमाणात करून घेतली जातात, दम दिला जातो, चुकी झाली तर पगार कापला जाईल, अशी धमकी सुद्धा दिली जाते. मग पगार महानगरपालिका वेळेवर का करत नाही, असा सवाल काही इंजिनियरांनी उपस्थित केला आहे. महानगरपालिकेच्या अधिकारी, इंजिनियर व कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोगसुद्धा लागू झालेला नसल्याचेही सूत्रांकडून कळते.
कंत्राटदार विशाल एक्स्पर्टाइज यांची बिलेच महानगरपालिका वेळेवर पास करत नसल्याने आमचे पगार मिळत नसल्याची खंत काही इंजिनियरांनी व्यक्त केली आहे. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी आस्थापना विभागाला आदेश दिला होता की, प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत पगार झालाच पाहिजे आणि तसा दर महिन्याला पगार होत होता. पण आता नवीन आलेले आयुक्त बळीराम पवार यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच पगार वेळेवर होत नसल्याचे इंजिनियर्संनी लोकमतला सांगितले आहे. महानगरपालिकेत शहर अभियंता माधव जवादे, कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड आणि सहाय्यक अभियंता एकनाथ ठाकरे, आर.के.पाटील, सुरेंद्र ठाकरे, प्रदीप पाचंगे व प्रकाश साटम या सर्व अधिकाºयांचे पगार वेळेवर होत असून इंजिनियर्सचे पगार रखडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका उदयाला आली तेव्हापासून किंवा त्याआधी नगरपालिका होती त्यावेळेचे अनेक इंजिनियर सध्या महानगरपालिकेत कामावर आहेत पण त्यांना अद्यापपर्यंत सेवेत कायमस्वरूपी रुजू करून घेतलेले नाही.

किती इंजिनियर असणे आवश्यक?
राज्य शासनाच्या आदेशानव्ये आकृती बंधानुसार वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अंदाजे १६७ इंजिनियर असणे गरजेचे आहे. पण सध्या १२२ इंजिनियरांकडून महानगरपालिका विविध विभागातील कामे करवून घेते. महानगरपालिकेत इंजिनियरांची कमतरता असतानांही हे इंजिनियरांकडून भरमसाठी कामे करवून घेतली जातात पण पगार मात्र वेळेवर होतच नाही.

पगाराची प्रक्रि या....
आस्थापना विभाग इंजिनियरांचे काम केलेले दिवस मोजून ठेकेदाराला सांगतात व त्याप्रमाणे ठेकेदार बिले मनपाच्या आस्थापना विभागात जमा करतात. नंतर उपायुक्तांकडे बिले गेल्यावर ते तपासून अकाऊंट विभागाकडे पाठवल्यानंतर आॅडिट विभागात बिले तपासून त्याच्या चेकवर सही करण्यासाठी ती अतिरिक्त आयुक्तांकडे पाठवली जातात. नंतर पगाराची रक्कम प्रत्येक इंजिनियरच्या खात्यावर आरटीजीएसने जमा होते.

करोडो रु पयांचा कर जमा होतो मग...
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामधून घरपट्टी, पाणीपट्टी, बांधकाम व नगररचना विभागातून महिन्याकाठी करोडो रुपयांचा कर जमा केला जातो, अनधिकृत मोबाईल टॉवरकडूनही करोडो रु पयांचा कर जमा केला जातो. इतक्या मोठ्या प्रमाणात कराच्या रु पात पैसा महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतो. मग इंजिनियरांचा पगार वेळेवर का केला जात नाही?

कसे काय पगार झाले नाही? मी बघतो आणि कळवतो. पगार होणे गरजेचे होते त्याबद्दल मला कोणीही काहीही बोलले नाही. - बळीराम पवार, आयुक्त, वसई-विरार शहर महानगरपालिका

Web Title: No salary for 122 engineers from last 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.