हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 02:05 AM2018-05-24T02:05:05+5:302018-05-24T02:05:05+5:30

भाजपा बनली भाडोत्री : आॅक्सिजनअभावी मृत झालेल्या बालकांचे शाप घेऊन योगी आदित्यनाथ आलेत

This is not a forest - Uddhav Thackeray | हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे

हा वनगा नाही वणवा आहे - उद्धव ठाकरे

googlenewsNext

वसई : श्रीनिवास वनगा हा वनगा नसून वणवा आहे, निष्ठावान कार्यकर्त्यांच्या उपेक्षेतून भडकलेला हा वणवा भाजपाला पराभूत करण्यास कारणीभूत ठरेल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील जाहीर सभेत केली.
मुख्यमंत्र्यांचा दुटप्पीपणा सांगतांना ते म्हणाले की, त्यांनी स्वत:च सांगितले की आम्ही काही महिन्यांपूर्वीच गावितांशी पालघरच्या विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याबाबत चर्चा केली होती. म्हणजे गद्दार कोण झाले? आधी पोटनिवडणूक मग लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि नंतर विधानसभेच्या निवडणूका होणार असतांना एवढ्या आधी तुम्ही गावितांशी संधान साधले होते.
तिकडे भाजपाने उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना प्रचारासाठी बोलाविले. म्हणे मार्गदर्शन करण्यासाठी बोलविले. कसले मार्गदर्शन. भाजपाच्या उमेदवारांना पराभूत कसे करावे याचे मार्गदर्शन. यांचा लोकसभा मतदारसंघ भाजपाचा बालेकिंल्ला असताना व हे राज्याचे मुख्यमंत्री असतांना तिथल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव होतो. याचा अर्थ काय?
हे योगी त्यांच्या राज्यात आॅक्सिजनअभावी मरण पावलेल्या चिमुकल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे शाप घेऊन आलेले आहेत. साधा आॅक्सिजन तुम्ही त्यांना देऊ शकला नाहीत. तुम्ही जनतेचे प्रश्न काय सोडवणार असा सवाल त्यांनी केला. भाजपा ही भाडोत्री झाली आहे. सभेला श्रोते भाडोत्री, उमेदवार भाडोत्री, वक्ते भाडोत्री असा सारा प्रकार आहे.
वनगांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गावितांना विजयी करा, असे भाजपा म्हणते. गावित विजयी झाले तर वनगांच्या आत्म्याला शांती लाभेल असे सांगते.मग त्यांचाच पुत्र जर या निवडणुकीत विजयी झाला तर त्यांच्या आत्म्याला शांती लाभणार नाही? त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही? काहितरी बोलायचे म्हणून बोलतात.
मोदी आणि भाजप सतत सांगतात देश बदल रहा है। खर आहे. मोदीजींसाठी देश बदल रहा है। कारण आज रशिया, उद्या अमेरिका, परवा चीन नंतर जपान अरे पण कधीतरी भारतात रहा. जनतेचे प्रश्न सोडवा, अशी खवचट त्यांनी केली. या वसईत दहशत माजवली जाते. परंतु मी सांगतो छत्रपती शिवरायांच्या या महाराष्टÑात कुणाचीही दहशत चालणार नाही. मोडून काढू, इथे फक्त शिवरायांचा दराराच चालेल.
या मुख्यमंत्र्यांच्या काळात घोषणाग्रस्त किंवा आश्वासनग्रस्त असा एक नवा वर्ग निर्माण झाला आहे. तोंड भरून घोषणा करतात, आश्वासन देतात पण प्रत्यक्षात काहीच होत नाही.
मीठागरांचा प्रश्न, विकास आराखड्याचा प्रश्न, सूर्याचे पाणी वाटपाचा प्रश्न, शहर बस वाहतुकीचा प्रश्न कायम ठेवणाऱ्या भाजपा आणि त्याच्या सरकारविरुद्ध आता जनतेनेच उठाव करावा आणि या निवडणुकीत पराभव करून त्याला धडा शिकवावा, असा आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्री थापाडे
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत साडे सहा हजार कोटी देण्याचे आश्वासन दिले. साडे सहा रुपये दिले नाही, असे हे थापाडे आहेत. वसई महापालिकेतील गावे वगळायची, कल्याण डोंबिवली महापालिकेतील गावे वगळायची एवढे साधे प्रश्न या मुख्यमंत्र्यांना सोडवता येत नाही. ते काय कामाचे? व्यक्ती म्हणून ते चांगले आहेत पण मुख्यमंत्री म्हणून निष्क्रिय आहेत, असे ते
म्हणाले.

Web Title: This is not a forest - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.