हॉटेल-रिसॉर्ट्सना नोटिसा; पालघर जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 11:35 PM2019-12-29T23:35:59+5:302019-12-29T23:36:10+5:30

ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हवर लक्ष, रेव्ह पार्ट्यांना बंदी

Notice to hotel-resorts; Police system ready in Palghar district | हॉटेल-रिसॉर्ट्सना नोटिसा; पालघर जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सज्ज

हॉटेल-रिसॉर्ट्सना नोटिसा; पालघर जिल्ह्यात पोलीस यंत्रणा सज्ज

Next

- मंगेश कराळे 

नालासोपारा : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जल्लोष होत असल्यामुळे याच दरम्यान काही अनुचित घटनाही घडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यातील पोलीस दल सज्ज झाले आहे. ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेस होण्याची शक्यता असल्याने ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. तसेच रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होणार नाही याचीही खबरदारी घेतली जात असून परिसरातील हॉटेल्स व रिसॉर्टना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार केलेली आहेत. दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्यातील पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेले पोलीस सज्ज झाले आहेत. अपघात होऊ नये, दारू पिऊन गाडी चालवू नये, ड्रग्स पिणाऱ्यांना पकडण्यासाठी, रेव्ह पार्टी होऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची पथके तयार करण्यात आली आहेत. या नवीन वर्षाच्या आदल्या दिवशी होणाºया कार्यक्रमाला कोणतेही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी पोलिसांकडून घेण्यात येणार आहे.

सर्वत्र नवीन वर्षांचे सेलिब्रेशन होते, पण मिनी गोवा म्हणून ओळखल्या जाणाºया वसई परिसरात ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात होते. सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट, चायनीज दुकाने, केक शॉप, बियर शॉप, वाईन्स शॉप यांना रंगरंगोटी करून उत्तम रोषणाई करून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. तालुक्यातील विविध हॉटेल्स आणि रिसॉर्टवाल्यांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यात दिलेल्या अटी व नियमांचे पालन न झाल्यास हॉटेल व रिसॉर्ट मालकावर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

घरी आणि इमारतींच्या गच्चीवर होणाºया नववर्षाच्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. जर पार्टीमध्ये मद्य घेतले जाणार नसेल तर परवानगी घेण्याची गरज नाही. पण जर मद्य घेतले जाणार असेल तर परवानगी घेणे आवश्यक आहे. याचबरोबर बार, धाबे, महामार्गावरील हॉटेल्समध्ये आयोजित केल्या जाणाºया पार्ट्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे. अबकारी विभागाने वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात पूर्व द्रूतगती मार्ग, मुंबई-अहमदाबाद आणि अन्य हॉटेल्सवर तपासणी सुरू केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार केलेली आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी नाकाबंदी केली जाणार आहे. रेव्ह पार्टी होणार नाही याची खबरदारी घेतली असून ड्रग्स पिणाºयांवरही नजर ठेवण्यात येणार आहे. हद्दीतील सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्टला नियम व अटींचे नोटीस पाठविण्यात आली आहे. आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
- विजयकांत सागर, अप्पर
पोलीस अधीक्षक, वसई

Web Title: Notice to hotel-resorts; Police system ready in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.