विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी बैठक, लोहमार्गालगतच्या जमीनमालकांना नोटिसांद्वारे निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 04:19 AM2017-11-02T04:19:21+5:302017-11-02T04:19:44+5:30

मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत होणाºया विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी पालघर येथे आयोजिण्यात आली आहे.

Notice for inviting Virar-Dahanu for four-laning, Land-based landlords | विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी बैठक, लोहमार्गालगतच्या जमीनमालकांना नोटिसांद्वारे निमंत्रण

विरार-डहाणू चौपदरीकरणासाठी बैठक, लोहमार्गालगतच्या जमीनमालकांना नोटिसांद्वारे निमंत्रण

Next

वसई : मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयुटीपी-३) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) मार्फत होणाºया विरार-डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण विषयीची महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी पालघर येथे आयोजिण्यात आली आहे. या रेल्वे विस्तारालगत असलेल्या जमीनीच्या मालकांना या बैठकीचे तलाठ्यांमार्फत नोटीसवजा निमंत्रण दिले गेल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
एमयूटीपी-१ च्या अंतर्गत २०१२ मध्ये कामे पूर्ण झाली असून एमयूटीपी-२ ची कामे सध्या सुरू आहेत. ३० नोव्हेंबर २०१६ रोजी एमयूटीपी-३ ला मंजुरी मिळाली असून त्यात ६३ किलोमीटरच्या विरार-डहाणू रोड चौपदरीकरणाच्या कामाचा समावेश करण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे लाइनच्या पूर्वेकडे माल वाहू द्रुतगती मार्ग अर्थात डेडीकेटेड फ्रेट कॉरिडोर (डीएफसी)चे काम सुरू असल्याने विरार-डहाणू रोड दरम्यान चौपदरीकरणांतर्गत टाकण्यात येणारी तिसरी व चौथी रेल्वे लाइन सध्याच्या रु ळांच्या पश्चिमेस टाकण्याचे प्रस्तावित आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या लोहमार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक करण्यात येणार असून नवे दोन ट्रॅक हे फक्त उपनगरीय सेवेसाठी वापरले जाणार आहेत. यामुळे उपनगरीय सेवांमध्ये वाढ होऊन या पट्टयातील परिवहन सोयीचे होऊ शकेल असे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे. याच बरोबरीने प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाच्या सुविधा पुरविण्याचा मानस पश्चिम रेल्वेने या योजनेसंदर्भात आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीद्वारे व्यक्त केला आहे.
चौपदरीकरणाच्या प्रकल्पामध्ये विरार-डहाणू रोड दरम्यान सर्वच रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला नवीन फलाटांची उभारणी होणार असून सफाळे व वाणगाव येथे नवीन विद्युत सब-स्टेशनची उभारणी, विरार, बोईसर व डहाणू रोड येथे सायडींग रु ळांची उभारणी, इएमयूच्या देखभालीसाठी कार्यशाळा किंवा तत्सम व्यवस्था, उड्डाणपूल, सबवेची उभारणी होणे अपेक्षित आहे.
या ६६ किलोमीटरच्या पट्ट्यात वैतरणा नदीवरील दोन महत्त्वपूर्ण पूलासह १६ मोठ्या व ६४ लहान पुलांची उभारणी केली जाणार आहे. या पट्टयातील १४ लेव्हल-क्रॉसींग बंद करून त्याऐवजी पर्यायी व्यवस्था उभारण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पाच उड्डाण पुलांचे रुंदीकरण करून दोन नवे उड्डाण पूल उभारण्याचे या प्रकल्पामध्ये प्रास्तावित आहे.
या चौपदरीकरणासाठी नव्याने जमिनीचे अधिग्रहण केले जाणार किंवा नाही याबाबत कोणत्याही प्रकारचे स्पष्ट संकेत नसले तरी या कामामध्ये इमारती, मंदिरे, तिकीट खिडक्या, झोपड्या, शौचालय, मेंटेनन्स खोल्या, कर्मचारी क्वॉटर्स आदी तोडण्यात येऊन ते नव्या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. शिवाय रेल्वे लगतच्या जमीन मालकांना या सभेचे निमंत्रण दिले गेल्याने त्याचा जमीन अधिग्रहणाशी संबंध असावा असा तर्क लावला जात आहे.
हे पाहता २ नोव्हेंबरच्या पालघर येथील मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या बैठकीला प्रवाशांसह रेल्वेलगतच्या जमीन मालकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

विरार-डहाणू रोड चौपदरीकरणात काय घडणार आहे?
- रेल्वे रुळालगतच्या २५०० झाडांची कत्तल होणार. त्यांच्या बदल्यात साडेबारा हजार वृक्षांची लागवड करण्याचे प्रस्तावित.
- बांधकामासाठी लागणाºया ५०० कामगारांच्या हंगामी निवास व्यवस्थेची उभारणी.
- अस्तित्वात असलेल्या रेल्वे रूळ व बांधकामादरम्यान बॅरिकेडींग करण्याचे प्रस्तावित
- अस्तित्वात असलेल्या जलवाहिन्या, इलेक्ट्रीक व टेलीकम्युनिकेशन केबल्स, गटारी व्यवस्थेचे तसेच ओव्हरहेड वायर, भूमिगत केबलचे होणार संवर्धन
- सुमारे ८.५ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवन (मॅनग्रोव्ह) ची कत्तल झाली तरी नियमाप्रमाणे त्यांची पुनर्लागवड होणार
- २९ लक्ष घनमीटर इतक्या भरावासाठी गौण खनिजाची लागणार गरज. त्याच्या उत्खननाची अधिकृत परवानगी असणाºयांकडूनच खरेदी होणार
- रेडी मिक्स कॉंक्र ीट प्लान्टची आवश्यकतेनुसार होणार उभारणी
- ४.५० लक्ष घनमीटर उंच भागाचे सपाटीकरण करून या मातीचा भरावासाठी होणार वापर
- पादचारी पुलांच्या उभारणीसाठी प्री-फॅब्रीेकेटेड साहित्याचा होणार वापर
- सफाळे, वाणगाव येथे दोन नव्या विद्युत सबस्टेशनची उभारणी, पालघरचे विद्युत सबस्टेशन स्थलांतरित होणार
- वृक्षांच्या पुनर्लागवडीसाठी होणार प्रयत्न. नैसर्गिक सौंदर्य राखण्यासाठी केले जाणार प्रयत्न

Web Title: Notice for inviting Virar-Dahanu for four-laning, Land-based landlords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.