पालिका रुग्णालय व कर विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2022 08:06 PM2022-02-07T20:06:44+5:302022-02-07T20:06:53+5:30

मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, डायलिसिस केंद्र येथील लिफ्ट बंद असणे, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छता, बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप आदी अनेक प्रकारच्या तक्रारी होत आहेत .

Notice to absent employees of Municipal Hospital and Tax Department | पालिका रुग्णालय व कर विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा

पालिका रुग्णालय व कर विभागातील गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरारोडच्या भारतरत्न इंदिरा गांधी पालिका रुग्णालयातील अस्वच्छता व गैरसोयी तक्रारीच्या अनुषंगाने पालिका उपायुक्तांनी अचानक पाहणी केली. त्यावेळी गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यासह स्वच्छता व नीटनेटकेपणा ठेवण्याचे आदेश त्यांनी दिले . कर विभागात सुद्धा कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळले . 

मीरारोडच्या इंदिरा गांधी रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र , डायलिसिस केंद्र येथील लिफ्ट बंद असणे , डासांचा प्रादुर्भाव , अस्वच्छता , बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप आदी अनेक प्रकारच्या तक्रारी होत आहेत . लोकमत ने देखील ह्या बाबतचे वृत्त दिले होते . रुग्णालयातील गैरसोय व तक्रारींच्या अनुषंगाने वैद्यकीय विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी शनिवारी रुग्णालयाची वैद्यकीय अधिकारी डॉ . नंदकिशोर लहाने यांच्या समवेत अचानक जाऊन पाहणी केली .  उपायुक्तांनी अचानक भेट दिल्याने रुग्णालयात काहीशी तारांबळ उडाली . उपायुक्तांनी साफसफाई , उपस्थिती कर्मचारी व गैरहजर कर्मचारी आदींचा आढावा घेतला . नागरिक  व कर्मचारी यांच्या कडे विचारपूस केली . आवश्यक त्याठिकाणी स्वच्छता, नीटनेटकेपणा ठेवण्याच्या सूचना केल्या . रुग्णालयीन अत्यावश्यक सेवेत असलेल्या गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्याचे आदेश उपायुक्तांनी डॉ. लहाने यांना दिले.  

रुग्णालय इमारतीच्या बाहेरच्या भागात असलेल्या प्रभाग समिती कार्यालय ५ सह समिती क्र . ४ व ६ च्या कर विभाग कार्यालयांना उपायुक्तांनी अचानक भेट देऊन कर वसुली आणि कामाचा आढावा घेतला . कर भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे आदेश असून देखील त्याचे उल्लंघन करून कामावर गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना करणे द्या नोटिसा बजावा असे सहाय्यक आयुक्त  सुदाम गोडसे याना सांगितले .  आयुक्त यांच्या आदेशानुसार कर वसुली वाढवा व त्यासाठी सुट्टीच्या दिवशी देखील कर निरीक्षक व कर्मचारी यांनी कर वसुली सुरू ठेवावी असे उपायुक्तांनी गोडसे यांना सांगितले . 

Web Title: Notice to absent employees of Municipal Hospital and Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.