आता बविआ पोटनिवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 01:31 AM2018-05-03T01:31:37+5:302018-05-03T01:31:37+5:30

दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्य पश्चात होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणूकित शिवसेनेने

Now in the Baviya bye-election fringe | आता बविआ पोटनिवडणुकीच्या रिंगणात

आता बविआ पोटनिवडणुकीच्या रिंगणात

Next

पारोळ : दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्य पश्चात होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणूकित शिवसेनेने आपला उमेदवार देण्याची घोषणा केल्या नंतर बहुजन विकास आघाडी काय भूमिका घेते या कडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागले होते. दरम्यान, बविआकडून उमेदवार उतरवला जाणार हे निश्चित झाल्याने ही पोटनिवडणूक आता चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नहेमीच युवांना जवळ करणाºया बविआने वि. वा. महाविद्यालयामध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आपले पत्ते उघडले असून निवडणूकीचे रणशिंग फुकंणार असल्याचे जाहिर केले आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करुन ८ मे रोजी आपल्या अधिकृत उमेदवाराची घोषणा होईल असे येथे उपस्थित असणाºया पक्षाच्या पुढाºयांनी सांगितले. बविआच्या या घोषणेमुळे कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना यांच्या बरोबर आता बहुजन विकास आघाडी ही आपला उमेदवार देणार असल्याने आता ही पोटनिवडणुक चौरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोटनिवडणूक जाहीर होताच कॉँग्रेस व भाजपा या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये लढत होणार या भोवतीच चर्चेचे राजकारण फिरत होते. मात्र, शिवसेनेने एकला चालो ची घोषणा करुन ही स्पर्धा काही दिवसांपूर्वी वाढविली होती. त्याचा फायदा कॉँग्रेसला होणार अशी चर्चा असताना या लोकसभा मतदार संघाला पहिला खासदार देणाºया बविआने आपले पत्ते उघडल्याने समिकरण बदलतांना दिसत आहे. दरम्यान, उमेदवार निवड ही कार्यकर्ते करणार असल्याचे बविआने सांगितले आहे.

Web Title: Now in the Baviya bye-election fringe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.