कुपोषण निर्मूलनाची मोहीम आता कीर्तनकारांच्या माध्यमातून
By admin | Published: June 16, 2017 01:49 AM2017-06-16T01:49:06+5:302017-06-16T01:49:06+5:30
तालुक्यातील नामवंत किर्तनकारांचा सत्कार बुधवारी एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडा नं. २ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.
- लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील नामवंत किर्तनकारांचा सत्कार बुधवारी एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडा नं. २ यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी ६० किर्तनकारांना मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
पालघर जिल्हा कुपोषण निमूलनासाठी किर्तनातून जनजागृती करण्याचे आवाहन यावेळी चौधरी यांनी केले. कुपोषण निर्मूलनासाठीच्या कार्यशाळेत प्रमुख पाहुण्यां म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी सभापती मूणाली नडगे, उपसभापती नंदकुमार पाटील, जि.प सदस्या धनश्री चौधरी, सामाजिक कार्यकर्ते धनंजय पष्टे, डॉ.गिरीश चौधरी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी प्रतिभाताई पष्टे, तर सूत्र संचालन जितेंद्र पाटील यांनी उत्तम केले.