रेशन वितरणावर आता नागरिकांची नजर

By Admin | Published: August 11, 2015 11:40 PM2015-08-11T23:40:50+5:302015-08-11T23:40:50+5:30

धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबविण्याकरीता तहसिलदार कार्यालयाने स्वत:ची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवरून गोदामात किती धान्य आले, किती दुकानदारांना वितरण

Now citizens look at the distribution of ration | रेशन वितरणावर आता नागरिकांची नजर

रेशन वितरणावर आता नागरिकांची नजर

googlenewsNext

वसई : धान्य वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार थांबविण्याकरीता तहसिलदार कार्यालयाने स्वत:ची वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटवरून गोदामात किती धान्य आले, किती दुकानदारांना वितरण करण्यात आले व धान्य उरले किती याची संपूर्ण माहिती देण्यात येत असते. आता पुरवठा विभागाने गोदामातून धान्य घेऊन ट्रक निघाल्याची माहिती छायाचित्रासहीत व्हॉट्सअ‍ॅपवर देण्याची योजना आखली आहे. धान्याचा ट्रक गोदामातून निघाल्यानंतर तो ट्रक दुकानात पोहोचला की नाही याची नागरीकांनी खात्री करावी यासाठी ही योजना आखण्यात आली आहे.
२ वर्षात वसई विरार उपप्रदेशातील धान्य वितरण व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. स्वस्त धान्य दुकानात धान्यच पोहोचत नव्हते त्यामुळे अनेक ठिकाणी संतप्त निदर्शनेही करण्यात आली होती. याप्रकरणी २ पुरवठा निरिक्षकांना निलंबित करण्यात आले. लोकांना धान्य मिळत नसल्याचे पाहून आ. हितेंद्र ठाकूर यांनी तहसिलदार व प्रांताधिकाऱ्यांना पाचारण केले व त्यांना त्वरीत वितरण व्यवस्था सुधारण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. दादा दातकर, तहसिलदार सुनिल कोळी व पुरवठा निरिक्षक प्रदिप मुकणे या तिघांनी एकत्र येऊन धान्य वितरण व्यवस्थेची माहिती सर्वसामान्य नागरीकांना होण्यासंदर्भात विविध निर्णय घेतले. त्यानुसार सर्वप्रथम वितरण व्यवस्थेची वेबसाईट सुरू करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पुरवठा निरिक्षक दिलीप मुकणे म्हणाले, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला चांगले यश मिळत असून लवकरात लवकर वितरण योग्य पद्धतीने होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Now citizens look at the distribution of ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.