आता शेतकऱ्यांना मिळणार मृद आरोग्यपत्रिका
By admin | Published: March 21, 2017 01:31 AM2017-03-21T01:31:43+5:302017-03-21T01:31:43+5:30
खतांच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना देण्यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत
पालघर : खतांच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना देण्यासाठी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मृद आरोग्यपत्रिका देण्यात येत आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मृद आरोग्यपत्रिका उपलब्ध करुन देणे हा प्रमुख उद्देश असून पालघर जिल्ह्यासाठी ३० मिनी लॅब लक्षांक प्राप्त झाला आहे.
या पत्रिकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमिनीचे रासायनिक गुणधर्म, स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सूक्ष्म मूलद्रव्यातील कमतरतेची माहिती शेतकऱ्यांना देण्यांत येते. या करीता मृद परीक्षक (मिनी लॅब) च्या माध्यमातून गावातच शेतकऱ्यांना जमिन आरोग्यपत्रिका उपलब्ध होणार आहे. संस्थेस, लाभधारकास मृद परीक्षक खरेदीकरीता अनुदानाचे आर्थिक निकष व अटी खालीलप्रमाणे राहतील.
खाजगी संस्था, लाभधारक यांना मृदा परीक्षक खरेदीसाठी एकूण किंमतीच्या ६० टक्के (जास्तीत जास्त रु . ४५००००/-) इतके अनुदान देय राहील., मृदा परीक्षक ची मोका तपासणी व कार्यरत झाल्या नंतर लाभार्थींना डी.बी.टी मार्फत अनुदान वितरीत करण्यांत येईल.
तद्नंतरचा अनुषंगिक,आवर्ती खर्चाबाबत शासनाकडून कोणतेही अनुदान देण्यांत येणांर नाही. वैयिक्तक शेतकऱ्यांकडून तपासणींस प्राप्त होणाऱ्या मृद नमुन्यांसाठी शासनाने निर्धारीत केलेले तपासणी शुल्क शेतकऱ्यांकडून घेण्याची अनुमती संस्थेस, लाभधारकास राहील. (वार्ताहर)