ग्रामसेवकांचा आता असहकार; आजपासून कामावर रुजू होणार, परंतु नॉन कोआॅपरेशनचे धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:58 PM2018-09-06T23:58:02+5:302018-09-06T23:58:10+5:30
पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
- हितेन नाईक
पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामसेवकानी १५ दिवसाच्या कामबंद आंदोलना नंतर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्या सोबत झालेल्या चर्चेअंती पुन्हा कामावर हजर होण्याचे मान्य केले असले तरी ते कार्यालयीन कामकाजातील असहकार सुरूच ठेवणार असल्याने त्याचा त्रास मात्र सर्वसामान्य जनतेला होणार आहे.
पालघर जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकरी अधिकारी (ग्रामपंचायत) पदी अशोक पाटील हे २० आॅगस्ट रोजी रुजू होण्या पूर्वीच लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवून जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक ह्यांनी २१ आॅगस्टपासून कामबंदला सुरुवात केली होती.
जिल्ह्यातील एकूण ४७३ ग्रामपंचायतीमध्ये १० ग्रामविकास अधिकारी आणि ५२ ग्रामसेवकांची पदे रिक्त असून अनेक अधिकाºयावर २-२ ग्रामपंचायतींचा भार आहे. आधीच ग्रामपंचायती मधील घरकुले, शौचालय उभारणी ही कामे रखडली असून तसेच १४ व्या वित्त आयोगा अंतर्गत निधी खर्च केला जात नसल्याने अनेक विकास कामे खोळंबण्याची शक्यता आहे.
पालघरच्या जिल्हा परिषदेच्या उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच अशोक पाटील ह्यांच्या वर अनेक आक्षेप नोंदविले होते.
... तर अशोक पाटलांवर कारवाई करण्यास मी सक्षम
तलासरी, डहाणू सह अनेक तालुक्यातील ग्रामसेवकांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला नव्हता. काहींनी दोन चार दिवसानंतर हळूहळू कामावर येणे सुरू केले असून अनेकांची रुजू व्हायची इच्छा आहे. मात्र महाराष्ट्र युनियन कडून कारवाई होण्याची भीती असल्याने ते रु जू झाले नाहीत.
ग्रामसेवकानी २१ आॅगस्ट पासून सुरू केलेल्या कामबंदची गंभीर दखल सीईओ मिलिंद बोरीकर यांनी घेवून त्यांना चर्चेला बोलाविले होते. अशोक पाटील यांनी कुठलेही नियमबाह्य काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास मी स्वत: सक्षम असल्याचा निर्वाळा दिला.
अशोक पाटीलांवरील आरोप हे वस्तुस्थितीला धरून नसल्याचे सांगून अनेक विकास कामे, दाखले, रखडू नये म्हणून तात्काळ रु जू होण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकाºयांनीही रजेवरील ग्रामविकास अधिकाºयांना नोटीसा बजावल्याचे गटविकास अधिकारी घोरपडेंनी सांगितले.
काम बंद आंदोलन पुकारून बेकायदेशीररित्या सामूहिक रजेवर गेलेल्या सर्व ग्रामविकास अधिकारी,ग्रामसेवक याच्या पगारातून रजेवर असलेल्या सर्व दिवसांचे पैसे कापून घेणार.
-मिलिंद बोरीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालघर
मुख्यकार्यकारी अधिकाºया सोबत झालेल्या चर्चे अंती आम्ही हे आंदोलन मागे घेत असून जनतेला वेठीस धरणार नाहीत. मात्र प्रशासनाला आम्ही सहकार्य करणार नाहीत.
- सुचित घरत, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र ग्रामसेवक संघटना, पालघर
आठ तालुक्यातील आकडेवारी
तालुके ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक
वसई ३१ १० १८
पालघर १३३ ३३ ९७
डहाणू ८५ ४२ ४१
तलासरी २१ १७ ०४
वाडा ८४ ०६ ६८
विक्र मगड ४२ ०५ २५
जव्हार ५० ०४ ३०
मोखाडा २७ ०३ १८