आता रेशनवर भरडधान्यात मिळणार नागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 11:53 PM2019-11-07T23:53:45+5:302019-11-07T23:54:05+5:30
श्रमजीवीची मागणी झाली मान्य : आदिवासी शेतकऱ्यांच्या पिकालाही मिळणार हमी भाव
जव्हार : शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेद्वारे शेतकऱ्यांचे धान्य हमी भावात खरेदी केले जाते. या धान्यांची भरडाई करून रेशनवर दिले जाते. यात आतापर्यंत ठाणे - पालघरमध्ये केवळ भात (धान) खरेदी केला जात होता. या भागातील शेतकरी पिकवतो आणि खातो अशा नागली ( रागी) या भरड धान्याचा समावेश रेशनिंगमध्ये करावा अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असून आता पारित झालेल्या भरडाई मार्गदर्शक शासन निर्णयात नागली हमी भावात खरेदी करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे या भागातील विशेषत: जव्हार, मोखाडा तसेच नाशिकमधील आदिवासी भागातील शेतकरी पिकवत असलेल्या नागलीला हमी भाव मिळणार असून स्थानिक पदार्थ रेशनवर मिळणार आहे.
शेतकºयाला हमी भाव मिळावा आणि येथील आदिवासी बांधव जे भरड धान्य आपल्या नियमित भोजनात घेतो तेच रेशनवर द्यावे अशी मागणी होती. आता रागी म्हणजेच नाचणी किंवा नागली या स्थानिक नावाने प्रचलित असलेले भरडधान्य आता हमी भावात म्हणजे तब्बल ३१५० रुपये प्रति क्विंटल या भावात खरेदी केला जाणार आहे. याची पूर्ण जबाबदारी आदिवासी भागात आदिवासी विकास महामंडळ तर बिगर आदिवासी भागात मार्केटिंग फेडरेशनची असेल. हे धान्य खरेदी करून त्याची स्थानिक मिलर्स कडून भरडाई करून घेऊन ते धान्य रेशनवर दिले जाईल असे शासन निर्णयात नमूद आहे.
या निर्णयामुळे येथील आदिवासी शेतकरी पिकवत असलेल्या नागलीला हमी भाव मिळणार असून शेतकºयांना नगदी पिकाच्या स्वरूपात नागलीचा लाभ होणार आहे.
दुहेरी लाभ मिळणार
च् नागलीची पौष्टीकता लक्षात घेता आदिवासींच्या आहारातही रेशनवरून सकस धान्य मिळणार आहे. त्यामुळे हमी भावासोबतच येथील आदिवासींना याचाही फायदा मिळणार आहे.