पाहणी दौऱ्यात आमदारांची डोळेझाक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 05:59 AM2018-10-05T05:59:59+5:302018-10-05T06:00:25+5:30
अधिकारी यशस्वी : समिती झाली धृतराष्ट्र
सुरेश काटे
तलासरी : रोजगार हमीच्या कामाची पाहणी करण्यासाठी निर्माण केलेल्या रोजगार हमी समितीची दिशाभूल करण्यात अधिकारी वर्ग यशस्वी झाला त्यामुळे निकृष्ट व न झालेल्या कामाची पाहणी करण्याकडे आमदारांची डोळेझाक झाली. गुरुवारी तलासरीत रोजगार हमी समितीचे आमदार विनायक मेटे, आमदार रूपनवर रामहरी, आमदार कुणावर यांनी रोजगार हमीच्या कामाची पाहणी केली सकाळ पासून सुरू झालेल्या दौºयात अधिकारी वर्गाने सोयीस्कररित्या ठराविक कामेच आमदारांना दाखविली.
तलासरी तालुक्यात रोजगार हमीच्या कामात सावळा गोंधळ असून भ्रष्टाचार ही मोठ्या प्रमाणात झाला आहे. रोजगार हमीची कामे करून दोन दोन वर्षे झाली तरी मजुरांना अद्याप मजुरी मिळाली नाही ती देण्याबाबत अधिकारी वर्ग गंभीर नसल्याने मजूर रोजगार हमीच्या कामावर काम करण्यास नाखूष आहे दौºयात आमदारांनी वरवाडा येथील वनविभागाचे जल शोषक चर, सावरोली येथील कृषी विभागा ची मजगी, ग्रामपंचायतीची घरकुले, करजगाव येथील शेततळी, सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराने बांधलेले राजीव गांधी भवन रोजगार इत्यादी कामाची पाहणी केली मात्र आमदारांना अधिकाºयांनी आपली सोयीस्कर कामेच दाखविली. त्यामुळे समिती कडून वाहव्वा मिळविली.
कामे होतात यंत्राने
तलासरी त रोजगार हमी योजना कुचकामी ठरत आहे मजुरांना मजुरी मिळत नाही , त्यामुळे ते रोहयोच्या कामावर येण्यास नाखूष आहेत त्यामुळे अधिकारी वर्ग मजुरांना कामे न देता ठेकेदारांकडून यंत्रांनी कामे करत आहे यात मोठा भ्रष्टाचार होत आहे.