अष्टकोनी विहीरीला फुटला पाझर
By Admin | Published: May 31, 2017 05:29 AM2017-05-31T05:29:57+5:302017-05-31T05:29:57+5:30
वसई किल्ल्यात असलेल्या अष्टकोनी या ऐतिहासिक विहीरीतील झरे मोकळे होऊ गोड पाण्याने विहीर भरायला सुरुवात झाली आहे. टिम
वसई : वसई किल्ल्यात असलेल्या अष्टकोनी या ऐतिहासिक विहीरीतील झरे मोकळे होऊ गोड पाण्याने विहीर भरायला सुरुवात झाली आहे. टिम आमची वसईने या विहीरीतील गाळ स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली होती. परिणामी विहीरीतील झरे मोकळे होऊन गोडे पाणी विहीरीत साचू लागले आहे.
वसई किल्ल्यात शंभरच्या आसपास गोड पाण्याचे स्त्रोत असून त्यात विहीरी, कुंड यांचा समावेश आहे. मात्र, ही जलस्त्रोत नियमितपणे मोकळी न करण्यात आल्याने बंद झाली आहेत.
किल्ल्यातील जलस्त्रोत मोकळी करण्याची मोहिम टिम आमची वसईने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ऐतिहासिक दुर्मिळ अष्टकोनी विहीर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. पर्यटकांनी सुंदर विहीरीत केरकचरा, दारुच्या बाटल्या, प्लास्टिक ग्लास, दगड टाकून तिला गाळाने भरून टाकले होते.
दुसरीकडे, विहीरीवर उगवलेल्या झाडांमुळे त्यात पालापाचोळा पडून विहीर नष्ट होण्याच्या मार्गावर होती.
थोड्या दिवसातच विहीरीत गोड े पाणी साचणार आहे. त्यामुळे यापरिसरातील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होणार आहे. टप्याटप्याने वसई किल्ल्यातील इतरही जलस्त्रोतेही स्वच्छ केली जाणार आहेत.
वाढत्या शहरीकरणामुळे वसई, विरार, नालसोपारा या भागामध्ये पाण्याची समस्या बिकट बनली आहे. पूर्वी या भागामध्ये विहिरींची संख्या मोठी होती. शहरातील जुन्या विहिरींवर काम सुरु केल्यास प्रभागातील पाण्याची समस्या सुटू शकेले.
२१ मे मोहिम सुरु
२१ मेपासून टिम आमची वसईने ही विहीर स्वच्छ करण्याची मोहिम हाती घेतली होती. त्यानंतर लायन्स क्लबच्या मदतीने विहीरीतील गाळ काढण्याची मोहिम हाती घेण्यात आली होती. गाळ काढल्यानंतर विहीर स्वच्छ झाली. त्यानंतर सहा ठिकाणांहून गोड पाण्याचे झरे वहायला सुरुवात झाली.