खंडणीखोर यादव विरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 12:34 AM2017-08-06T00:34:22+5:302017-08-06T00:34:22+5:30

बिल्डरांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल असलेल्या डॉ. अनिल यादवविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बेहिशोबी अर्थात ८१ लाख २१ हजार

Offense against Property Tax Tribunal | खंडणीखोर यादव विरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा

खंडणीखोर यादव विरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा

Next

वसई : बिल्डरांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल असलेल्या डॉ. अनिल यादवविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बेहिशोबी अर्थात ८१ लाख २१ हजार ८३० रुपयांची अपसंपदा असल्याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसई-विरार परिसरातील बिल्डरांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी मागणाºया यादव याच्याविरोधात खंडणीचे चार गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. तो सध्या जामिनावर असून त्याच्या विरोधात पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तो सरकारी सेवेत वैद्यकीय अधिकारी आहे. नवघर माणिकपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात लाच घेताना अटक झाल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. निलंबनानंतर तो पुन्हा सरकारी सेवेत रुजू आहे. पण, कामावर रुजू न झालेल्या यादवला खंडणी प्रकरणात पालघरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चार गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.
तपासात त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळून आली आहे. त्यामुळे पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी कलम १३(१) ई सह १३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Offense against Property Tax Tribunal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.