तेल तवंगाने किनारे विद्रूप, पर्यावरणाला धोका, प्लॅटफॉर्म व कंटेनरमधून फेकल्या जाणाऱ्या क्रूडच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:12 AM2017-08-21T06:12:14+5:302017-08-21T06:12:52+5:30

 Oil shrimps, squares, environmental hazards, platforms and containers | तेल तवंगाने किनारे विद्रूप, पर्यावरणाला धोका, प्लॅटफॉर्म व कंटेनरमधून फेकल्या जाणाऱ्या क्रूडच्या

तेल तवंगाने किनारे विद्रूप, पर्यावरणाला धोका, प्लॅटफॉर्म व कंटेनरमधून फेकल्या जाणाऱ्या क्रूडच्या

Next

- हितेन नाईक 
पालघर : ओएनजीसी तेलशुद्धीकरण प्रकल्पासह समुद्रातून जाणाऱ्या मोठमोठ्या कंटेनरमधून फेकण्यात येणाºया क्रूड आॅइलचे तवंग व थर जिल्ह्यातील सर्व सागरीक्षेत्रात पसरल्याने मोठ्या प्रमाणात माशांची नष्ट झालेली अंडी किनाºयावर येवून दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पर्यटन विकास धोक्यात आला आहे.
ओएनजीसी प्रकल्पांतर्गत समुद्रात तेल व वायू साठ्यांच्या सर्वेक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आले असून केंद्र सरकारने मच्छीमारांचे नुकसान टाळण्याच्या दृष्टीने ओएनजीसी सोबत नियुक्त केलेल्या कमिटीत या सर्वेक्षणाबाबतचे निर्णय विचारविनिमयाने घेण्यात येत असत. वाजपेयी सरकारच्या काळात तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी या कमिटीची स्थापना केली होती. परंतु मागील काही वर्षांपासून समुद्रात सर्वेक्षण करतांना ओएनजीसीचे अधिकारी या कमेटीला विश्वासात घेत नाहीत. या महाकाय बोटींद्वारे होणाऱ्या सर्वेक्षणामुळे समुद्रातील मोठा भाग प्रतिबंधित ठरवून त्या भागात मासेमारी करण्यापासून मच्छीमाराना वंचित ठेवले जाते. परिणामी त्यांचे मोठे नुकसान तर होतेच शिवाय समुद्रात उभारलेल्या अनेक महाकाय प्लॅटफॉर्म वर सुरु असलेल्या तेल उत्खननामधून गळतीद्वारे मोठ्याप्रमाणात कच्चे आॅइल समुद्रात पडून त्याचे गोळे होतात व ते वाहून किनारपट्टीवर जमा होतात. नंतर त्यांचे ढिग तयार होतात.
या तेल उत्खनन आणि तेलाची वाहतूक करणाºया महाकाय जहाजाची स्वच्छता समुद्रात करतांना त्यातील आॅईल मोठ्याप्रमाणात समुद्रात फेकले जात असून त्यामुळे होणाºया प्रदूषणाचे प्रमाण वाढू लागले आहे. समुद्रातील तवंगामुळे मत्स्यबीजांची हानी होत असून खाड्यामधील कालवे, शिंपले, चिंबोरी, बोय आदींचे प्रमाण कमी होते आहे. या स्वरुपाची जी मच्छी हाती येते तिला तेलाचा वास येत असल्याने तिची मागणी घटू लागली आहे. त्यामुळे खाड्यातील मत्स्यसंपदेवर आपला उदरिनर्वाह करणारी अनेक आदिवासी, गरीब कुटुंबे रोजगारीहिन होणार आहेत.
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या केळवे, बोर्डी, माहीम, अर्नाळा, कळंब, शिरगाव, सातपाटी, एडवन आदी सुंदर किनारपट्टीवर पर्यटन वाढीला वाव असल्याने विकास आराखडा बनवला आहे. या पर्यटन विकासासाठी पालकमंत्र्यांनी लाखो रुपयांची तरतूद केली असून केळवे, शिरगाव येथे पर्यटकांसाठी अनेक सोयीसुविधा निर्माण केल्या आहेत. या पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अशावेळी वसई तालुक्यातील किनारपट्टीपासून ते थेट डहाणू तालुक्यातील झाई-बोर्डीच्या किनाºयावर हे डांबरचे गोळे मोठ्याप्रमाणात लागले आहेत. हे तेल समुद्रात पोहायला उतरणाऱ्या पर्यटकांच्या अंगालाही चिकटते. किनाºयावर फिरायला जाणाºयांच्याही पायलाही ते चिटकत असल्याने पर्यटक या किनाºयांपासून दूरावण्याची भीती पर्यटन व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हे प्रदूषण थांबविणारी उपाययोजना करण्याची गरज आहे.

...तर हरित लवादाकडे याचिका
किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम आखून हा कचरा साफ करून उपाययोजना आखायला हव्यात किंवा सहकारी संस्था, संघटना यांना हे प्रदूषण करणाºयां विरोधात याचिका दाखल करता येईल काय या बाबत चाचपणी सुरु आहे, सरकार जर काहीच करणार नसेल तर हाच उपाय उरला आहे. अशी माहिती एका संघटनेच्या प्रतिनिधींनी लोकमतला दिली.

प्रदूषणाचा फटका खाडीतील मच्छीमारीला

या तेलाच्या तवंगामुळे प्लवंगरूपात समुद्रात तरंगत असलेली अंडी (मत्स्यबीज) नष्ट होणार असून खाडीवर अवलंबून असलेला पारंपरिक मच्छिमार उध्वस्त होणार आहे. - प्रो. भूषण भोईर.

Web Title:  Oil shrimps, squares, environmental hazards, platforms and containers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.