आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची होणार वेट टेस्टिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 02:59 AM2017-09-18T02:59:45+5:302017-09-18T02:59:49+5:30

आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टिंग केली जाणार आहे. पूल सहा तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, चार महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या पुलाची क्षमता तपासली जाणार आहे.

 The old Warasova Bridge, which started after eight months of repair, will be known as Wet Testing | आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची होणार वेट टेस्टिंग

आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची होणार वेट टेस्टिंग

Next

शशी करपे 
वसई : आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टिंग केली जाणार आहे. पूल सहा तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, चार महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या पुलाची क्षमता तपासली जाणार आहे.
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील ४८.५ मीटर लांबीच्या जुन्या वरसोवा पुलाला ४३ वर्षे उलटून गेली आहेत. २०१४ साली पुलाच्या एका गर्डरला तडा गेल्यापासून, या मार्गावरील वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्या वेळी नवीन गर्डर बसविण्याच्या कामासाठी तब्बल सहा महिने लागले होते. तेव्हापासून पूल कमकुवत असल्याने, दुरुस्तीच्या नावाखाली वारंवार बंद करण्यात येत आहे. गर्डर बदल्यानंतर पूल पुन्हा नादुरुस्ती झाल्याने, १६ सप्टेंबर २०१६ ते १८ मे २०१७पर्यंत पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. या काळात नव्या पुलावरून एकेरी वाहतुकीची व्यवस्था करण्यात येत होती. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या दहा-दहा किलोमीटरच्या रांगा लागून वाहनचालकांना अडकून पडावे लागत होते. या पुलाची दुरुस्ती लवकर करून, वाहनांसाठी खुला करण्यात यावा, या मागणीसाठी विविध पक्षांना ‘रास्ता रोको’ आंदोलनेही केली होती.
१९ मेपासून हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला आहे. मात्र, आता याच पुलावरून हलक्या आणि जड वाहनांसाठी वेगवेगळ््या रांगा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा पूल जड वाहनांच्या वाहतुेकीसाठी कितपत टिकेल, असाच प्रश्न उपस्थित केला जात होता. नेमका आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुन्या पुलाची वेट टेस्टिंग घेण्याच्या निर्णय घेतला आहे. येत्या १९ सप्टेंबरला सकाळी ८ वाजल्यापासून टेस्टिंग सुरू करण्यात येणार आहे. ही चाचणी सहा तास चालणार आहे. त्यामुळे या पुलावरील वाहतूक सकाळी ८ वाजल्यापासून चाचणी पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
नव्या पुलावरून वाहतूक
जुना पूल बंद केल्यानंतर नव्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक पंधरा पंधरा मिनिटांच्या फरकाने टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार आहे. पूल बंद झाल्यानंतर दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूककोंडी होती, तसेच रस्त्याच्या विरुद्ध दिशेने मोठ्या प्रमाणात हलकी आणि अवजड वाहने मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका संभवतो.
या अनुभव लक्षात घेऊन महामार्ग वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. वरसोवा खाडी पूल, जी. एन. मोटेल, रॉयल गार्डन, एस. पी. धाबा, लोढा धाम व चिंचोटी नाका या सात ठिकाणी नाके तयार करण्यात येणार आहेत. या वेळी ७५ पोलीस कर्मचारी, ५० बॅरीकेटस आणि २०० कोन वाहतुकीचे नियमन करण्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

Web Title:  The old Warasova Bridge, which started after eight months of repair, will be known as Wet Testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.