अपूर्ण कोरममुळे ओंदे ग्रामसभा झाली तहकूब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 02:46 AM2018-04-30T02:46:04+5:302018-04-30T02:46:04+5:30
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नवीन आर्थिक वर्षाची ग्रामसभा घेण्यात येते. याच निमित्ताने ओंदे ग्रामपंचायतीची ग्रामसभा २८
तलवाडा : महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिन निमित्ताने प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नवीन आर्थिक वर्षाची ग्रामसभा घेण्यात येते. याच निमित्ताने ओंदे ग्रामपंचायतीची ग्रामसभा २८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यास जवळपास ३५०० ग्रामस्थांनी नाराजी दाखवत अनुपिस्थती दाखवली. फक्त ४९ ग्रामस्थ या ग्रामसभेला उपस्थित असल्याने ग्रामसभेचा उपस्थिती कोरम पुर्ण न झाल्याने ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच चंद्रकला खुताडे यांच्या परवानगीणे ग्रामसेविका वंदना प्रसाद यांनी ही ग्रामसभा ग्रामस्थांच्या कमी व कॉरम पूर्ण न झाल्याने तहकूब करण्यात येते असे घोषित केले.
ग्रामसभा तहकूब करण्याची कारणे लक्षात घेता काही उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले की, प्रत्येक ग्रामसभेला घेतलेले ठराव फक्त कागदावरच राबवले जातात. ५ टक्के पेसा निधी, १४ वित्त निधीतून झालेल्या कामांची माहिती व झालेला खर्च ग्रामस्थांना ग्रामसभेत दिली जात नाही. ग्रामस्थ माहिती अधिकारात माहिती मागूनही ग्रामसेवक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रस्त्यावर एलइडी दिवे निकृष्ट दर्जाचे बसवण्यात आले हे दिवे १५ ते ३० दिवसातच बंद पडल्याने ग्रामपंचायतीने केलेला खर्च वाया गेला आहे. याची तक्र ार करूनही ग्रापंचायतीने कुठलीही ठोस पावले उचललेली नाहीत.
खांड गावातील पाणी पुरवठा करणारी लहान नळ योजना निकृष्ट दर्जाची आहे. जनाठेपाड्यामध्ये नळ योजने करीता ३८ लाख खर्च करूनही पाणी टंचाई भिडसावत आहे. असा विकास कामा बद्ल अनेक तक्रारी करूनही ग्रामपंचायत विभाग दुर्लक्ष करते. या सर्व परिस्थिती बद्दल ग्रामस्थ नाराज असल्याने ग्रामस्थांनी या ग्रामसभेला अनुपस्थिती दाखवीत नाराजी व्यक्त केली असल्याचे चित्र समोर आले आहे.