बापरे! वसईच्या 100 फुटी रोडवर पावसाच्या पाण्यावर तरंगत होते गॅस सिलिंडर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 11:47 PM2021-07-18T23:47:21+5:302021-07-18T23:52:40+5:30

Gas Cylinder in Rain Water: वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं माणिकपूर पोलिसांनी सिलेंडर्स घेतली ताब्यात

OMG! lots of gas cylinders were floating on rainwater on the 100-foot road in Vasai | बापरे! वसईच्या 100 फुटी रोडवर पावसाच्या पाण्यावर तरंगत होते गॅस सिलिंडर्स 

बापरे! वसईच्या 100 फुटी रोडवर पावसाच्या पाण्यावर तरंगत होते गॅस सिलिंडर्स 

googlenewsNext

- आशिष राणे

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : नवघर मणिकपूर शहरातील 100 फुटी रोडवर पावसाच्या पाण्यात चक्क शेकडो गॅस सिलेंडर्स रविवारी दुपार पासून तरंगतानाचा धक्कादायक प्रकार संध्याकाळी उशिरा समोर आला आहे.

या प्रकरणी स्थानिक रहिवाशांनी माहिती दिल्यानंतर वसई विरार शहर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं माणिकपूर पोलिसांनी ही सर्व सिलेंडर्स ताब्यात घेत सुरक्षितता म्हणून मदतकार्य केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि,17 जुलै  पासून वसईत दमदार पाऊस पडत असताना रविवार दि.18 जुलै रोजी देखील दिवसभर बऱ्यापैकी पाऊस बरसताना 100 फुटी रोडवर टेम्पो स्टँड येथील (एट माईन्स ) या मुख्य रस्त्यावर पावसाच्या पाण्यात उभ्या असलेल्या एका गॅस कंपनीची टेंपोतील 70 ते 80 कमर्शियल गॅस सिलेंडर्स अक्षरशः इकडे तिकडे पाण्यावर तरंगत होती . मात्र दुपार पासून संध्याकाळी पर्यंत तरंगत असलेल्या आणि अशा धोकादायक ठरू शकणाऱ्या सिलेंडर्सकडे मात्र कोणीही लक्ष कसे दिले नाही हे आश्चर्य आहे.

दरम्यान शेवटी रविवारी रात्री 8 30 च्या सुमारास स्थानिक रहिवाशांनीं माणिकपूर पोलीसांना संपर्क केल्यावर वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं माणिकपूर पोलिसांनी येथील पाण्यावर तरंगत असलेली जवळपास 70 ते 80 गॅस सिलेंडर्स ताब्यात घेत ती सर्व गोळा करीत टेम्पो सहित सुरक्षित स्थळी म्हणजेच पोलिसांनी ताब्यात घेतली त्यामुळे येथील मोठा अनर्थ टळला आहे.

मात्र धक्कादायक म्हणजे याठिकाणी भर रस्त्यावर टेम्पोत शेकडो गॅस सिलेंडर्स  अशी खुलेआम कोणी ठेवली आणि ती पावसाच्या पाण्यात तरंगताना कशी आढळून आली हे मात्र कोडंच राहिलं असून माणिकपूर पोलीस निरीक्षक या गॅस कंपनी व त्यांच्या वितरक व टेम्पो चालकावर आता कायद्यानुसार काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: OMG! lots of gas cylinders were floating on rainwater on the 100-foot road in Vasai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.