वसई-विरार शहरात ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव; नालासोपारामधील 1 रुग्ण झाला बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 09:24 PM2021-12-14T21:24:54+5:302021-12-14T21:25:36+5:30
नालासोपारामधील 1 रुग्ण ओमयक्रोनने बाधित; मात्र कोणतीही लक्षणं नाहीत.
-आशिष राणे
वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीत अखेर ओमायक्रोनच्या विषाणूने मंगळवारी शिरकाव केला आहे त्यामुळे आता वसई तालुक्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार शहर महापालिका हद्दीतील नालासोपारा शहरात राहणारा मात्र मुंबईत नोकरी निमित्ताने पश्चिम रेल्वेने (लोकल )प्रवास करणारा पहिला तरुण रुग्ण ( 35 ) आढळून आला आहे.दरम्यान हा रुग्ण नालासोपाराचा असून तो नालासोपारा ते मुंबई असा लोकलने प्रवास करायचा नोकरीच्या निमित्ताने कामाला जाण्यासाठी त्याने ही आरटीपीसीआर चाचणी केली असता त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे.
दिलासादायक बाब अशी की,सदरचा बाधित रुग्णास कोणतीही लक्षणं आढळून आली नाहीत तर तो सध्या घरीच उपचार घेत होता मात्र त्याचा मंगळवारी ओमायक्रोन चा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सतर्कता म्हणून त्यास वसई विरार महापालिका प्रशासनाने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ति चौधरी यांनी लोकमतला दिली. एकुणच या घटनेने आता वसई विरार महापालिका प्रशासनाचा वैद्यकीय आरोग्य विभाग सतर्क झाला असून वसई विरार शहरातून नित्याने प्रवास करणाऱ्या रुग्णांची माहिती घेतली जाणं आवश्यक झाले आहे
नालासोपारा राहणारा एक 35 वर्षीय तरुण रुग्ण ओमायक्रोनने बाधित आहे. मात्र त्यास कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत त्याला आम्ही सतर्कता म्हणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतो आहोत.
- भक्ती चौधरी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी