ओमकार अॅकॅडमीचे तिघे स्पर्धा परीक्षेत यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:55 AM2017-08-02T01:55:32+5:302017-08-02T01:55:32+5:30
माझ्या जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर ह्याच मातीतून जन्मलेला व समस्यांची जाणीव असलेला एखादा विद्यार्थी आयएएस,
पालघर : माझ्या जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर ह्याच मातीतून जन्मलेला व समस्यांची जाणीव असलेला एखादा विद्यार्थी आयएएस, किंवा आयपीएस अधिकारी बनला पाहिजे. हे निलेश सांबरे यांचे स्वप्न खºया अर्थाने सत्यात उतरविण्यासाठी धडपडणाºया झडपोलीच्या ओमकार अकॅडमीचा हितेश दिगंबर गोतारणे या विद्यार्थ्यांसह अन्य दोन विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससी २०१७ ची प्रिलिम उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
जन्मत:च हुशार असणाºया व प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाºया विद्यार्थ्यांना नेहमीच अनेक खडतर प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागते. नेमकी हिच खरी गरज ओळखून जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी विक्र मगड या तालुक्यातील झडपोली येथील आपल्या घरा शेजारीच ओमकार एमपीएससी, यूपीएससी अॅकॅडमीची भव्य अशी इमारत उभी केली. तीमध्ये क्लासरूम, अभ्यासक्रमासाठी सर्व पुस्तकानी युक्त अशी लायब्ररी राहण्याची, जेवणाची सोय या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध केल्या आहेत. प्रथम जिल्हातील मोजक्याच ६० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या शिक्षणासाठी पुण्यातील तज्ज्ञांची निवड केल्याचे सांबरे ह्यांनी लोकमतला सांगितले. त्यापैकी प्रथम ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून हुशार, होतकरू अशा विद्यार्थ्यांनी या अॅकॅडमीत अभ्यास केल्यानंतर हितेश गोतारणे हा विद्यार्थी यूपीएससी-१७ च्या प्रिलिम परीक्षेत पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेला आहे. तर वाडा येथून दिलीप नेहरकर, दुर्वेश जाधव (मेट), निखिल पाटील हा विद्यार्थी एमपीएससी प्रीलियम परीक्षेत पास होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरला आहे. तसेच तलासरी येथील वाचनालयाचा लाभ घेऊन कृष्णा मारु ती फडतडे हे उपशिक्षणाधिकारी झाले आहेत. दुर्वेश जाधव-(मेट), निखिल पाटील-हमरापुर, हे विद्यार्थी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेसाठी पात्र झाल्याची माहिती जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी दिली.