क्रीडाप्रेमींसाठी गुड न्यूज! वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 05:44 PM2023-12-06T17:44:39+5:302023-12-06T17:46:08+5:30
वसई-विरार मॅरेथॉनसाठी पश्चिम रेल्वेने रविवारी पहाटे विशेष लोकल ट्रेन चालविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
Vasai-Virar Marathon 2023: वसई-विरार मॅरेथॉनसाठीपश्चिम रेल्वेने रविवारी पहाटे विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे. विरार ते चर्चगेट दरम्यान अतिरिक्त गाड्या धीम्या मार्गावर चालविण्यात येणार आहे.त्यामुळे या मॅरेथॉनमधील सहभागी नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, "पश्चिम रेल्वेने यंदाच्या ११ व्या वसई - विरार मॅरेथॉन २०२३ मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या सोयीसाठी चर्चगेट आणि विरार स्थानकांदरम्यान १० डिसेंबर २०२३ या दिवशी विशेष लोकलची सेवा पुरविण्यात येणार आहेत. या लोकल पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांवर थांबतील. तसेच पश्चिम रेल्वेने या मॅरेथाॉन दरम्यान सोडण्यात येणाऱ्या अतिरिक्त लोकल सेवांचे वेळापत्रक शेअर केले आहे. . या विशेष लोकलचे थांबे तसेच वेळा यासंदर्भात देखील रेल्वेने माहिती दिली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पहिली लोकल विरार ते चर्चगेट अप दिशेने विरार स्थानकांवरून मध्य रात्री २.०० वाजता सुटणार आहे. तसेच चर्चगेटला पहाटे ४.२० वाजता पोहचेल. या विशेष लोकल नालासोपारा, वसई रोड, नायगांव, भायंदर, मीरा रोड, दहीसर, बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगांव, राम मंदिर, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रुज, खाररोड, वांद्रे, माहिम, माटुंगा रोड, दादर, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रांट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाइन्स स्थानकांवर थांबतील.
स्टेशन स्पेशल १ स्पेशल २
चर्चगेट (मध्य रात्री) २.०० २.४५
विरार ( पहाटे) ३.३५ ४.२०