भूकंपाच्या धक्क्याने घराची भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:23 AM2019-07-25T11:23:48+5:302019-07-25T11:24:02+5:30

डहाणू, तलासरी भागात रात्री एकच्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत.

One dies after an earthquake strikes the wall of a house | भूकंपाच्या धक्क्याने घराची भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू

भूकंपाच्या धक्क्याने घराची भिंत अंगावर पडून एकाचा मृत्यू

Next

पालघर डहाणू/बोर्डी- डहाणू, तलासरी भागात रात्री एकच्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांनी नागझरी, वसावलापाडा येथील शेतावरील घर पडल्याने, त्यात झोपलेल्या मेघवाले ( वय 55 वर्षे) यांचा जागीच मृत्यू झाला. पालघर जिल्हाधिकारी, डहाणू प्रांत अधिकारी घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती डहाणू तहसीलदार राहुल सारंग यांनी दिली.

पालघरमधील डहाणूतील नागझरी, वसावलापाडा येथे सकाळी 1 वाजताच्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. सदर घटनेत नागझरी, वसावलापाडा येथील रिष्या मेघवाले (स्त्री/ वय 55 वर्षे) यांचे घर अंगावर कोसळल्यामुळे त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे.

Web Title: One dies after an earthquake strikes the wall of a house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.