मीरा रोडमध्ये गोळीबारात एकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 07:10 IST2025-01-04T07:09:48+5:302025-01-04T07:10:50+5:30

रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची कार्यवाही सुरु होती...

One killed in shooting on Mira Road | मीरा रोडमध्ये गोळीबारात एकाची हत्या

मीरा रोडमध्ये गोळीबारात एकाची हत्या

मीरा रोड : मीरा रोड रेल्वे स्थानकजवळील शॉपिंग सेंटरमध्ये एका व्यक्तीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. गोळीबार करून हल्लेखोर पसार झाला. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा हल्लेखोराचा शोध घेत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

   मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरच्या बी विंग भागात शम्स सब्रीद अन्सारी उर्फ सोनू (३५) हा साहित्य विकायचा. शुक्रवारी रात्री दुकान बंद करून शम्स बाहेर उभे होते. त्यावेळी चेहऱ्यावर कापड गुंडाळलेल्या हल्लेखोराने शम्स यांच्या डोक्यात गोळी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाडसह नयानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमर जगदाळेसह अन्य अधिकारी व कर्मचारी, मीरा भाईंदर गुन्हे शाखा युनिट १ चे निरीक्षक अविराज कुराडे,  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शम्स हा एका गुन्ह्यात साक्षीदार होता. त्याला धमक्या दिल्या जात होत्या व तशी तक्रार त्याने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेमागे युसूफ नावाच्या इसमाचे नाव येत आहे. पोलिस संशयित युसूफचा शोध घेत आहेत.
 

Web Title: One killed in shooting on Mira Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.