दाभोसा धबधब्यात एक पर्यटक बुडाला तर दुसरा गंभीर जखमी; १२० फूट उंचीवरून दोघांनी डोहात उडी मारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2024 04:04 PM2024-05-05T16:04:23+5:302024-05-05T16:05:08+5:30

घटना व्हिडीओत कैद 

one tourist drowned another seriously injured in dabhosa falls both of them jumped from a height of 120 feet | दाभोसा धबधब्यात एक पर्यटक बुडाला तर दुसरा गंभीर जखमी; १२० फूट उंचीवरून दोघांनी डोहात उडी मारली

दाभोसा धबधब्यात एक पर्यटक बुडाला तर दुसरा गंभीर जखमी; १२० फूट उंचीवरून दोघांनी डोहात उडी मारली

हुसेन मेमन, जव्हार: पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील प्रसिद्ध दाभोसा धबधब्यात मुंबई येथील दोघा हौशी पर्यटकानी धबधबा सुरू होतो तेथून थेट १२० फूट उंचीवरून खोल डोहात उडी मारली यात एक पर्यटक वरती आलाच नाही तो बुडला तर दुसरा वरती आला मात्र गंभीर जखमी अवस्थेत, ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. या घटनेचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दाभोसा धबधब्यात मुंबई मिरा-भाईंदर येथील 24 वर्षीय तीन तरुण मित्र पर्यटक दाभोसा धबधब्या जवळ आले, त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज न्हवता. यातील दोन पर्यटकांनी थेट धबधबा सुरू होतो तेथे पोहोचले तर तिसरा पर्यटक खाली डोहा जवळून त्यांचा व्हिडिओ काढत होता. 

सध्या धबधब्याला पाणी कमी होता, धबधब्यावरून पाण्याची धारही कमी होती, तरीही या हौशी दोन पर्यटकांनी अंदाजे १२० फूट लांब डोहात उडी मारली, दुर्दैवाने यातील एक पर्यटक माज शेख वरती आलाच नाही तो बुडला, तर त्याचा मित्र जोएफ शेख कसाबसा वर आला मात्र तो गंभीर जखमी झाला त्याच्या कमरेला, पायाला, मानेवर जबर मार लागला आहे. जखमीला कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या पर्यटकाचा सोध सुरू असल्याची माहिती जव्हार पोलिसांनी दिली 

मुंबई तथा बाहेगावाहून येणारे हौशी पर्यटकांना येथील खोलीचा अंदाज नसतो त्यांना त्यांच्या  पोहण्याची क्षमता कमी असते अश्यात हे पर्यटक टोकाचा पाऊल उचलतात त्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. कृपया आपल्या पालकांनी मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ते कुठे जातात काय करतात याबाबत चौकशी करणे गरजेचे आहे. जेणे करुन अशा घटना टाळण्यास मदत होईल. - संजकुमार ब्राह्मणे, पोलीस निरीक्षक,जव्हार पोलीस ठाणे.

Web Title: one tourist drowned another seriously injured in dabhosa falls both of them jumped from a height of 120 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palgharपालघर