वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 12:29 AM2019-06-25T00:29:42+5:302019-06-25T00:29:54+5:30

शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही.

Online sat bara is problem for people in Vasai taluka | वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

वसई तालुक्यात आॅनलाईन सातबारा ठरतोय डोकेदुखी

Next

- आशिष राणे
वसई - शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आनलाईन सातबार देण्यास सुरूवात केली असली तरी मात्र वसईच्या शहरी व ग्रामीण भागात अनेकदा इंटरनेट बंद असल्याने सामान्य जनतेसह शेतकऱ्यांना वेळेवर सातबारा मिळत नाही. परिणामी शेतकºयांना व गरजूंना वेळेवर कामे करणे अवघड होत आहेत. त्यामुळे वर्षोनुवर्षे सुरू असलेले हे आॅनलाईन सातबाराचे काम आता शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
दरम्यान अचूक संगणकीकृत सातबारा देण्यासाठी राज्यात भूमि अभिलेख विभागाकडून केंद्र पुरस्कृत डिजीटल इंडिया लँड रेकार्ड मॉडर्नायझेशन प्रोग्राम राबविण्यात येत आहे.
त्याअंतर्गत पुण्याच्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने ई-फेरफारची प्रणाली विकसीत केली आहे. त्यातच फोर-टी क्वाईन हे साफ्टवेअर बंद होऊन आता क्लाऊड सॉफ्टवेअर हे नव्याने सुरु करण्यात आले आहे,नेहमीच सरकार नवनविन प्रणाली राबवते, त्यात आता सद्यस्थितीत नवीन क्लाऊड सॉफ्टवेअरला तहसीलदार सहीत मंडळ अधिकारी व तलाठ्यांचे ठसे नोंदणी करीता ओटीपी नंबर टाकून नोंद करावी लागते. मात्र कधी सर्व्हर डाऊन तर कधी लिंकच फेल होत असल्याने सामान्य जनतेला व शेतकºयांना वेळीच सातबारा मिळण्यास मोठी अडचण होत आहे. काहीवेळा सर्व्हर सुरु होतो मात्र त्यात गती नसल्याने कामे होत नाहीत. त्यात विजेच्या लपंडावाची भर पडते तर कधी संगणकाच्या नादुरूस्तीने खोळंबा होत असतो.

सगळे दाखवतात एकमेकांकडे बोट, प्रचंड चुका, तहसीलदार लक्ष देत नाहीत ? गठठे पडून
आनलाईन सातबारात प्रचंड चुका असल्याने त्या दुरु स्तीसाठी पुन्हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार वसई तालुका तहसीलदारांच्याकडे अर्ज करावा लागतो. या प्रक्रि येतही बराच वेळ जात आहे. तलाठी, तहसील कार्यालयाकडे बोट दाखवत आहेत, तर कधी मंडळ अधिकारी यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.
त्यामुळे सामान्य वर्ग,आदिवासी शेतकºयांना मुलांच्या विविध दाखल्यांसाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक कर्ज अथवा इतर कामे अद्यावत करण्यासाठी या सातबाराची मोठी गरज भासत आहे. मात्र, सातबारा चुकीचा असल्याने व चुकांची दुरु स्ती करण्यात वर्षोनुवर्षे वेळ लागत असल्याने आॅनलाईन सातबारा सामान्य जनता,आदिवासी ,व शेतकºयांसाठी बºयापैकी तापदायक ठरत आहे.

आॅनलाईन सातबारा चे संगणकीय कामकाज पूर्ण झाले असून केवळ आता सातबारा व फेरफार चुका आहेत,त्या दुरु स्ती चे काम कलम १५५ नुसार सुरू आहे,लवकर च हे काम पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे
- किरण सुरवसे, वसई तहसीलदार, वसई तालुका

Web Title: Online sat bara is problem for people in Vasai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.