१२२ करोड घोटाळ्यातील एकमेव कंत्राटदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:27 PM2019-04-25T23:27:58+5:302019-04-25T23:28:16+5:30

‘ते’ २४ जण मोकाट; तपास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ?

The only contractor involved in the 122 crore scam | १२२ करोड घोटाळ्यातील एकमेव कंत्राटदार अटकेत

१२२ करोड घोटाळ्यातील एकमेव कंत्राटदार अटकेत

Next

नालासोपारा : सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारच्या सभेत मनपाच्या १२२ कोटीचा भ्रष्टाचाराची एसआयटी चौकशी करणार असल्याचा सज्जड दम दिल्यानंतर मनपाने आणि विरार पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून २५ पैकी एका कंत्राटदाराला मंगळवारी संध्याकाळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, इतर २४ कंत्राटदारावर अद्याप कोणती कारवाई केलेली नाही.

मनपामध्ये १२२ कोटीचा घोटाळा झाल्या प्रकरणी २५ ठेकेदारांवर विरार पोलीस ठाण्यात २ मार्च २०१९ ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, गुन्हा दाखल होऊन ५२ दिवस झाले तरी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक सोनावणे यांनी तपास सुरू आहे असे सांगून कारवाई करत असल्याच सरकारी उत्तर लोकमतला दिले. मनोज पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हा घोटाळा चर्चेत आला. युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेकरिता सोमवारी सोमवारी मुख्यमंत्र्यांंनी एसआयटी चौकशी करण्याचे सांगितल्यावर आकाश इंटरप्रायजेसचे विलास चव्हाण यांना अटक केले करण्यात आली. मात्र, बाकीचे राजकीय वरदहस्त लाभलेले २४ कंत्राटदार अजुनही मोकाट आहेत. सदर गुन्ह्याचा उलगडा करून खरोखरच कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी हा गुन्हा विरार पोलिसांकडून काढून पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. याबाबत फोनवरून पो. नि. विवेक सोनावणे यांना विचारणा केले त्यांनी टाळाटाळ केली.

गुन्हे दाखल झालेले २५ घोटाळेबाज
दिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकुर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सिर्व्हिस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई इंटरप्राइजेस (विनोद पाटील), बालाजी सिर्वस (मंगरूळे बी. दिगंबरराव), वरद इंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद इंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक इंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्तिट्रकल एंड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक इंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व इंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम इंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), आकाश इंटरप्रायजेस (विलास चव्हाण), युनिव्हर्सल इंटरप्रायजेस (सुबोध देवरु खकर), बी एल होणेंस्ट सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आण िश्री अनंत इंटरप्रायजेस (रवी चव्हाण)

नेमके काय होते प्रकरण :
वसई विरार मनपाच्या ३१६५ ठेका कर्मचाºयांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता या ठेकेदारांनी हडप केला आहे. या घोटाळ्यात २९ कोटी ५० लाख रुपयेचा शासकीय महसूलचाही समावेश असून ९२ करोड ५० लाख रु पये कर्मचाºयांच्या पगाराचे आहेत.

अटक केली की नाही मी सांगू शकत नाही. तसे सांगितले तर बाकीचे पळून जातील.
- विवेक सोनावणे (पो.नि., विरार)

नेमके प्रकरण काय आहे तसेच, ते का असे बोलले याचा मी तपास करतो. - विजयकांत सागर
(अप्पर पोलीस अधीक्षक, वसई)

Web Title: The only contractor involved in the 122 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक