आरोग्यास अपायकारक पाण्याची खुलेआम विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 01:03 AM2020-01-10T01:03:55+5:302020-01-10T01:03:59+5:30

वसई-विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक अशुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

Open sale of harmful water to health | आरोग्यास अपायकारक पाण्याची खुलेआम विक्री

आरोग्यास अपायकारक पाण्याची खुलेआम विक्री

Next

नालासोपारा : वसई-विरार शहरात खुलेआमपणे आरोग्यास अपायकारक अशुद्ध पिण्याच्या पाण्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वसई-विरार शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याने पिण्याचे दूषित पाणी विक्री करणाऱ्या शहरातील ५१ व्यावसायिकांवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तुळींज पोलीस ठाण्यात मंगळवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पाणी विक्रेते आणि व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.
साथीच्या विविध आजारांपासून रक्षण व्हावे यासाठी वसई-विरार शहरातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक लोक दैनंदिन पिण्याच्या वापरासाठी पाणी खरेदी करतात, मात्र आपण पीत असलेले हे पाणी नेमके कसे आहे? याबाबत नागरिकांना फुसटशी कल्पना देखील नसते. नागरिक विकत घेऊन पीत असलेले हे पाणी आरोग्यास घातक असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
पिण्याच्या पाण्याची विक्री करणाºया अनेक बोगस कंपन्या वसई-विरार शहरात ठिकठिकाणी बस्तान मांडून बसल्या आहेत. विनापरवानगी बेकायदेशीरपणे या कंपन्या शहरातील नागरिकांना बिनदिक्तपणे अशुद्ध आणि पिण्यास अपायकारक पाणी विकून महिन्याकाठी लाखो रु पयांची कमाई करीत आहेत.
महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभाग समितीमधील पिण्याच्या पाण्याचे नमुने मुख्य अणुजीवशास्त्र, जिल्हा आरोग्य प्रयोग शाळा, ठाणे यांच्यामार्फत तपासले गेले असता सदरचे पाणी हे पिण्यासाठी अपायकारक असल्याचा अभिप्राय देण्यात आला आहेत.
महापालिका प्रशासनाकडून या पाणी विक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या असल्या तरीही या बोगस कंपन्यांनी महापालिकेच्या आदेशाला न जुमानता पाणी विक्र ीचा व्यवसाय चालूच ठेवला आहे. महानगरपालिकेच्या केवळ एकाच प्रभागात इतक्या मोठ्या प्रमाणात बोगस कंपन्या आहेत, तर इतर प्रभागांत काय अवस्था असेल, असा सवालही सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. अशुद्ध पिण्याचे पाणी राजरोसपणे विकले जात असल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
>गुन्हे दाखल झालेले पाणीविक्र ी व्यावसायिक
शिवकुमार चौहान, रविकांत उपाध्याय, औरंगजेब, मोहंमद हयान, अशोक गुप्ता, मोबिन अन्सारी, मोनू सोनी, दिलीप सिंग, तयब अली, चंदन श्रीवास्तव, मनीष मिश्रा, दाऊद शेख, अमित सिद्दिकी, धर्मेंद्र यादव, सुरजी गुप्ता, सनी गुप्ता, विनय गुप्ता, दिनेश पारधी, मोहंमद रुस्तम, जगदीश पाटील, मुजीब खान, रामचंद्र यादव, अवधेश गुप्ता, रोशन कुमावत, महेश सोळंखी, विजय शहा, मोहंमद कासीम, अब्दुल गनी मोहंमद, हरिश्वर सोनी, शमीम खान, मोहंमद सहानी, दिलीप पांडे, मोहंमद शाबीर, रामचंद्र रभी, मोहंमद आयुब, शिव मिश्रा, अभिलाष गोस्वामी, मुशर्रफ खान, संतोष शिंदे, तरन्नुम शेख, आरिफ शेख, पन्नालाल गुप्ता, राजेश कश्यप, दिलीप सिंग, मोहंमद शाहीन, कल्पेश जैन, मोहंमद इस्लाम, अजित तुंबडा, कविता सोनवणे, अभिषेक गुप्ता आणि हरिलाल गुप्ता.
>नालासोपारा पूर्व परिसरात ५१ व्यावसायिकांकडून पिण्यास अयोग्य पाण्याची विक्री केली जात असल्याची व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊन आजार होण्याचा संभव असल्याची तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
- नीलेश जाधव, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक,
‘ब’ प्रभाग, वसई-विरार शहर महानगरपालिका.

Web Title: Open sale of harmful water to health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.