‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलिसांपुढे आव्हान, शोध, पुनर्वसनासाठी १४ दिवसांचा कालावधी बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:26 AM2020-03-18T00:26:44+5:302020-03-18T00:27:11+5:30

ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

'Operation Muskan' challenges police | ‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलिसांपुढे आव्हान, शोध, पुनर्वसनासाठी १४ दिवसांचा कालावधी बाकी

‘ऑपरेशन मुस्कान’चे पोलिसांपुढे आव्हान, शोध, पुनर्वसनासाठी १४ दिवसांचा कालावधी बाकी

Next

- हितेन नाईक
पालघर : अपहरण आणि हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी पालघर जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन मुस्कान ८ या मोहिमेअंतर्गत पोलिसांपुढे अपहरण केलेल्या २०० तर हरवलेल्या सुमारे २ हजार ३९६ अशा एकूण २ हजार ५९६ लोकांना शोधून त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. त्याच्यासमोर आता अवघ्या १४ दिवसांचा कालावधी हाती उरला आहे.
हरविलेल्या तसेच अपहरण केलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ मार्चदरम्यान आॅपरेशन मुस्कान ८ ही विशेष मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे. सदर आॅपरेशन मुस्कान विशेष मोहीम पालघर जिल्ह्यात देखील सुरू करण्यात आली असून जिल्ह्यातील एकूण २३ पोलीस ठाण्यांमध्ये एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचा समावेश असलेले प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. या मोहिमेची योग्यरीत्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा पोलीस उपअधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २ मार्च २०२० रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे बैठक घेण्यात आली होती.
स्थानिक गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्यात समन्वय करून पालघर जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व रेकॉर्ड व्यतिरिक्त बेवारस बालकांचा जातीने लक्ष पुरवीत त्यांचा शोध घेऊन ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे उपअधीक्षक विक्रांंत देशमुख यांनी सांगितले. परंतु सध्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येत मुलांचे अपहरण होत असताना त्यांचा शोध घेण्याची व त्यांच्या पालकांपर्यंत त्यांना सुखरूप पोचवण्याचे आव्हान पोलिसांना पेलावे लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने देशात व सर्वच राज्यात अपहरण व हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. त्या अंतर्गत हरवलेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी आॅपरेशन मुस्कान ८ ही मोहीम पालघर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेमार्फत राबविण्यात येत आहे. मुलांचे आश्रमगृह अशासकीय संस्था रेल्वे स्थानक बस स्थानक रस्त्यात भीक मागणारी अथवा वस्तू विकणारी मुले, कचरा गोळा करणारी मुले, धार्मिक स्थळे, रुग्णालय, हॉटेल, दुकाने इत्यादी ठिकाणी कामावर असलेली मुले त्यांचे फोटो घेऊन त्यांचे अद्ययावत माहिती तयार करण्यात येणार असून सदर कालावधीत सापडलेल्या मुलांची माहिती घेऊन त्यांचे आई-वडील किंवा त्यांचे कायदेशीर पालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर मोहिमेअंतर्गत हरवलेला जास्तीत जास्त बालकांचा शोध घेण्यात येऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. अपहरण केलेल्या हरवलेल्या व बेवारस मुलाचा शोध लागल्यावर त्यांना बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. ज्या मुलाचे पालक मुलगा आपला असल्याचा दावा करतील त्यांना आपले पालकत्वाचे पुरावे द्यावे लागणार आहेत.

देशात प्रतिवर्षी एक लाख बालके हरवल्याची, बेवारस झाल्याची नोंद
देशात साधारण प्रति वर्षी १ लाख बालक हरवल्याची व बेवारसाची नोंद होत असते. यातील ११ हजार मुले पुन्हा घरी परतली नसल्याचे एक अहवालात नमूद करण्यात आले आहे. यातील बहुतांश मुले ही तस्करी, बालमजुरी व वेशावृत्ती याकरिता संघटित गुन्हेगारांमार्फत गायब केली जात असल्याचे तपासाअंती निदर्शनास आले आहे. मुस्कान ८ ही मोहीम स्थानीय गुन्हे शाखा पालघर व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांच्याशी समन्वय करून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील रेकॉर्डवरील व विनारेकॉर्डवरील बालकांचा जास्तीत जास्त शोध घेऊन ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्र ांत देशमुख यांनी सांगितले.

Web Title: 'Operation Muskan' challenges police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.