मोदी लाटेच्या प्रभावाने विरोधक निष्प्रभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:23 AM2019-05-24T00:23:28+5:302019-05-24T00:23:48+5:30
पालघरच्या सूर्या कॉलनीतील पुरवठा विभागाच्या गोदाम क्र मांक २ मध्ये सकाळी ८ वाजता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली.
पालघर: पुन्हा एकदा देशात मोदी लाटेच्या प्रभावाने विरोधक निष्प्रभ ठरले असतांना पालघर लोकसभेच्या निवडणुकीतही शिवसेना महायुतीच्या राजेंद्र गावितांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांचा जवळपास एक लाखाच्या प्रचंड मताधिक्यांंनी दणदणीत पराभव केला. तर तिसऱ्या नंबर वर नोटा ने बाजी मारून अन्य १० उमेदवारां पेक्षा जास्त मते घेतली. या निवडणुकीत अन्य १० उमेदवारांचे मताधिक्य पाहता त्याचे डिपॉझिट जप्त होणार आहे.
पालघरच्या सूर्या कॉलनीतील पुरवठा विभागाच्या गोदाम क्र मांक २ मध्ये सकाळी ८ वाजता पोलिसांच्या कडक बंदोबस्तात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीत सेनेच्या राजेंद्र गावितांनी बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव ह्यांच्यावर ५४३ मतांनी आघाडी घेतली.मात्र त्या नंतरच्या सलग ३ फेº्यांपर्यंत बविआ च्या जाधव यांनी ३ हजर ४९० मतांची आघाडी घेतल्याने बविआ च्या गटात आनंदाचे वातावरण होते. त्या नंतरच्या ४ फेºयात पुन्हा गावितांनी बविआ ने घेतलेली आघाडी कमी करून ३ हजार ४४० मतांची आघाडी घेतली. पुन्हा ९ आणि १० व्या फेरीत बविआच्या जाधव यांनी गवितांनी घेतलेली आघाडी तोडून १ हजार ५४७ मतांची आघाडी घेण्यात यश मिळविले. एकमेकावर वरचढ होण्याची १० व्या फेरीपर्यंत चाललेली खेळी अखेर गावितांनी संपुष्टात आणून अखेरच्या फेरी पर्यंत त्यांनी घेतलेली आघाडी वाढवितच नेऊन ८९१४२ मतांनी विजय संपादन केला. त्यामुळे १० व्या फेरी पर्यंत दोघांमध्ये विजयासाठी चाललेली चुरस पुढे संपुष्टात येत फक्त विजयी आकडा जाहीर होण्या पर्यंत मर्यादित राहिली.
दहा जणांना १५ हजाराचा टप्पा ओलांडता आला नाही
गावित आणि जाधव या दोन उमेदवारांमध्ये चाललेल्या लढतीत एकही अन्य उमेदवाराचा प्रभाव दिसून आला नाही. बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, वाढवण बंदर, सीआरझेड मधील बदल, शिपिंग कॉरिडॉर आदी स्थानिकांना उध्वस्त करणाºया प्रकल्प असल्याचे सांगत दंड थोपटून निवडणुकीत उडी घेतलेल्या व अपक्ष निवडणूक लढविणाºया दत्ताराम करबट यांना चिल्लर मते मिळाली. वंचित आघाडी चे उमेदवार सुरेश पाडवी, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय कोहकेरा, मार्किस्ट लेननिस्ट पार्टी आॅफ इंडिया चे शंकर बदादे या उमेदवारांना १५ हजाराचा टप्पा ही पार करता आला नाही. त्यामुळे अन्य १० उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार आहे.