दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 02:48 AM2017-12-13T02:48:16+5:302017-12-13T02:48:49+5:30

केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे.

Opposition to Damanganga Coal Project, Viraat Sabha, agitation for farmers in Vavar Vangani | दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार

दमणगंगा जोड प्रकल्पाला विरोध, वावर वांगणी येथे शेतक-यांची विराट सभा, आंदोलन उभारणार

googlenewsNext

- हुसेन मेमन

जव्हार : केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे. हा हा प्रकल्प जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात व गुजरात, दादरा नगर हवेली आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वावर वांगणी येथील कारगिल हिल टेकडीजवळ होणार असून त्याचे काम चालू करण्याच्या हालचाली केंद्र शासनाकडून होवू लागल्या आहेत. हा प्रकल्प मोडीत काढण्यासाठी जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे १२ डिसेंबर रोजी झालेल्या सभेला शेतकºयांनी हजारोंच्या संख्यने उपस्थित राहून त्याला तीव्र विरोध दर्शविला आहे.
गुजरात, दादरा नगरहवेली या राज्यांच्या सीमेवर महाराष्ट्रातील पालघर जिल्हा जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे होणाºया नदीजोड प्रकल्पाच्या कामांच्या हालचाली होऊ लागल्या असून केंद्र शासनाचे अधिकारी रोजच येवून या परिस्थितीचा आढावा घेवून, कामाची पुढील रुपरेषा तयार करीत आहेत. त्यामुळे या होणा-या नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी शेतकºयांनी वावर वांगणी येथे मोर्चाचे आयोजन करून भव्य सभा घेण्यात आली. या परिसरातील हजारो शेतकरी आणि नागरीवस्ती विस्थापित होणार असल्यामुळे येथील शेतकºयांनी व नागरिकांनी त्याला प्रचंड उपस्थिती दर्शवून कडाडून विरोध दर्शविला आहे.
नदीजोड दमणगंगा प्रकल्प नारपार नद्या, वाघ नदी, लेंडी नदी, दमण गंगा या नद्यांचा जोड प्रकल्प होणार आहे. या प्रकल्पाचे प्रस्तावित काम आता शासनाकडून चालू होण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे हा प्रकल्प होवू न देण्याचा निर्धार येथील शेतकºयांनी केला आहे. या प्रकल्पा विरोधात स्थानिक आक्र मक झाले असून, सध्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होवून प्रकल्पाचे काम सुरु होण्याचे चिन्ह असून, स्थानिकांना विश्वासात न घेता हे काम सुरु असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत
पेसा कायदा लागू असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वावर वांगणी या नदीजोड प्रकल्पामुळे २५ हजार कुटुंबे विस्थापित होणार असून, या प्रकल्पात जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर या तालुक्यातील गावे, पाडे या जाणार आहेत. शेकडो कुटुंबे विस्थापित होणार असून, चार लाख लोकांचे पुनर्वसन आणि जगण्याचा प्रश्न उद्भवणार आहे. त्यामुळे हा विरोध दर्शविण्यात आला आहे.
नदीजोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी माकपा केंद्रीय कमेटी अध्यक्ष डॉ अशोक ढवळे आणि पालघर जिल्हा जि. प. सदस्य रतन बुधर यांच्या नेतृवाखाली शेतकºयांनी आंदोलन केले.
तसेच प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, यशवंत घाटाळ, सरपंच, ताराबाई शिंदे, उपसरपंच यशवंत बुधर परिसरातील शेतकरी वर्ग, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Opposition to Damanganga Coal Project, Viraat Sabha, agitation for farmers in Vavar Vangani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.