महागाईविरोधात शिवसेनेचा आज बोईसरला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:58 AM2017-10-11T01:58:34+5:302017-10-11T01:58:41+5:30
वाढत जाणारी महगाई, रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच रेल्वे स्टेशन वरील समस्या, भारनियमन इत्यादींचा जाब विचारण्याकरिता शिवसेना बुधवारी संध्याकाळी ४.०० वाजता मोर्चा काढणार आहे
बोईसर : वाढत जाणारी महगाई, रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच रेल्वे स्टेशन वरील समस्या, भारनियमन इत्यादींचा जाब विचारण्याकरिता शिवसेना बुधवारी संध्याकाळी ४.०० वाजता मोर्चा काढणार आहे तो हॉटेल मधुर ते रेल्वे स्टेशन असा निघणार असून प्रशासकीय अधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या जनसामान्यांच्या विरोधी धोरणामुळे इंधनामध्ये आणि घरगुती गॅसची वारंवार होणारी दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव ह्यांमुळे जनता महागाईत होरपळली आहे. बोईसर व परिसरातील मुख्य रस्ते खड्डेमय झालेले आहेत. तसेच आवश्यक नसताना महाराष्ट्र राज्यावर न परवडणारी लादण्यात आलेली बुलेट ट्रेन, बोईसर रेल्वे स्टेशनवरील जुना पादचारी पूल (ब्रिज) पाडून नवीन बांधणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे आदी मागण्याही करण्यात येणार असल्याचे शिवसेना शहर प्रमुख निलम संखे यांनी सांगितले.