फे्र ट रेल्वे कॉरिडोरला विरोध
By admin | Published: February 23, 2017 05:29 AM2017-02-23T05:29:07+5:302017-02-23T05:29:07+5:30
फे्र ट रेल्वे कॉरि़डोर रद्द करण्यात यावा आणि वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात
वसई : फे्र ट रेल्वे कॉरि़डोर रद्द करण्यात यावा आणि वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी कॉ. गोदावरी परुळेकर मार्क्सवादी विचार मंचच्या वतीने बुधवारी वसईच्या प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
बुधवारी दुपारी चिमाजी अप्पा मैदानातून प्रांत कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. दिल्ली ते उरण दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे वसई पूर्व भागातील हजारो भूमिपुत्र विस्थापित होणार आहेत. महसूल विभाग व रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्व कल्पना न देता जमिनीचे सातबारे रेल्वेच्या नावे केले आहेत. त्यामुळे भूमीपुत्राला भूमीहीन करणारा प्रकल्प रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेरोजगारी, मासेमारी व्यवसायातील मंदी, कंत्राटी कामगाराची उपासमार थांबवावी, तुंगारेश्वर मंदिरात जाणाऱ्या भाविकांची होणारी अडवणूक थांबवावी व वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करावी आदी विविध प्रश्नावर सरकारला जाब विचारून मागण्या मांडण्यात आल्या.
मोर्च्याच्या शिष्टमंडळाने प्रांतअधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पुढील मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार असल्याचे सांगण्यात आले. क्रांतिकारी मार्क्सवादी पक्ष,कॉ.गोदावरी परुळेकर मार्क्सवादी विचारमंच व जनसंघटना आदी मोर्च्यात सहभागी झाल्या होत्या. (वार्ताहर)