प्रदूषण टाळण्यासाठी पालघरमध्ये १५ हजार इको-फ्रेण्डली पिशव्यांचे वाटप
By admin | Published: October 5, 2015 12:12 AM2015-10-05T00:12:04+5:302015-10-05T00:12:04+5:30
पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यापासून सर्वसामान्य ग्राहकांना परावृत्त करणे तसेच त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करणे
पालघर : पर्यावरणाला घातक असणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यापासून सर्वसामान्य ग्राहकांना परावृत्त करणे तसेच त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाविषयी जागृती निर्माण करणे, यासाठी बहुजन विकास आघाडीचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि प्रथम महापौर राजीव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघरमध्ये १५ हजार इको-फ्रेण्डली पिशव्यांचे वाटप केले.
पालघर बहुजन विकास युवा आघाडी व गेट-टुगेदर यांच्या सौजन्याने २ व ३ आॅक्टोबरला दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवस कार्यक्रमावर भपकेबाज खर्च न करता पैशांचा योग्य विनियोग करण्याच्या दृष्टीने तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, माजी राज्यमंत्री मनीषा निमकर, सभापती सुरेश तरे, विवेक निमकर, हेमंत म्हात्रे, पोषण्णा, योगेश पाटील यांनी पालघरच्या आठवडाबाजारात, रेल्वे स्टेशन ते कमला पार्कपर्यंत रॅलीचे आयोजन केले होते.
या वेळी आठवडाबाजारात खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पिशव्यांचे वाटप करीत त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. (प्रतिनिधी)