पालिकेच्या आदेशालाच भाव नाही; मैदानाएवजी चौकात भाजी विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 05:42 PM2020-03-30T17:42:06+5:302020-03-30T17:42:30+5:30
वसई-विरार शहर लॉकडाऊन झाल्यापासुन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी विविध चौकात भाजी मार्केट भरत होती.
- प्रतिक ठाकुर
विरार : शहरात जीवनावश्यक वस्तूंसाठी रस्त्यावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने भाजी विक्रेत्यांना मोकळ्या मैदानात भाजी विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही विक्रेते मैदानात भाजी विक्री करत आहेत, मात्र काही अद्यापही पालिकेच्या आदेशाला मानत नसून चौकातच भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर गर्दी जमून शहरात करोना फैलाव होण्याची सतावत आहे.
वसई-विरार शहर लॉकडाऊन झाल्यापासुन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी विविध चौकात भाजी मार्केट भरत होती. या मार्केटमुळे रस्त्यावर अनावश्यक गर्दी जमत होती तसेच सोशल डीस्टन्सिंग चा अवलंब करणे हे जागेच्या कमतरतेमुळे शकत होत नव्हते. यामुळे करोनाचा धोका वाढत चालला होता. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विक्रेत्यांना मैदानात भाजी विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार विरार येथील मलांज ग्राउंड, माणिकपूर मैदान, नरवीर चिमाजी आप्पा मैदान, मर्सेस मैदान व पोलीस स्टेशन मागील मैदान अशा शहरातील प्रमुख मैदानात भाजी विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या मैदानात भाजीविक्रेते हे ठराविक अंतरावर बसणार असून, सोशल डीस्टन्सिंग ने नागरिकांनी भाजी खरेदी करावी, यासाठी महापालिकेतर्फे आखणीही करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्वच मैदानावर सध्या भाजी विक्रीस सुरुवात झाली आहे. भाजी खरेदी दरम्यान नागरिक सुद्धा आखणी करून दिलेल्यानुसार सोशल डीस्टन्सिंग ठेवून भाजी खरेदी करत आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही भाजी विक्रेते चौकात बसून भाजी विक्री करत आहेत. यामुळे रस्त्यावर अनावश्यक गर्दी जमत असून करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे पालिकेने अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतेय.
मैदानात भाजी विक्रीस न बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान असे आणखीन काही भाजी विक्रेते आढळल्यास त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे.
-रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका