घरात सीसीटीव्ही लावण्याचा आदेश मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:33 AM2018-04-28T02:33:44+5:302018-04-28T02:33:44+5:30
भूषणचे वडील व आई विणा म्हात्रे यांनी भूषण व अपर्णा यांच्या विरु ध्द न्यायालयात या दोघांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा व पोटगीची मागणी दाखल केला आहे.
पारोळ : नायगाव येथील खोचिवडे परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेच्या घरात ५ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लाऊन ते चित्रीकरण कोर्टात सादर करावे असे आदेश न्यायालयाने दिले होते. या प्रकरणाची दखल प्रसार माध्यमानी घेतल्यावर न्यायाधीश हाशमी यानी हे आदेश मागे घेत घरात लावण्यात आलेले कॅमेरे काढून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश या महिलेच्या कुटुंबियांना देण्यात आले.
वसईच्या सहदिवाणी (कनिष्ट स्तर) न्यायालयात खोचिवडे येथील भंडारआळीत राहणारे भूषण म्हात्रे (३८) व त्यांची पत्नी अपर्णा म्हात्रे (३३) हे दामप्त्य भूषणचे वडिल विश्वनाथ म्हात्रे यांच्या, अर्थात वडिलोपार्जित घरात राहतात. भूषणचे वडील व आई विणा म्हात्रे यांनी भूषण व अपर्णा यांच्या विरु ध्द न्यायालयात या दोघांकडून त्रास दिला जात असल्याचा दावा व पोटगीची मागणी दाखल केला आहे. दरम्यान, विश्वनाथ व विणा म्हात्रे यांना सहदिवाणी न्यायाधिश (कनिष्ठ स्तर) एच. ए. एच. आय. हाशमी यांनी घरात पाच सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावण्याचा तसेच विश्वनाथ यांनी सी.सी.टी.व्ही.च्या प्रति (सीडी) महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात दाखल करावयाचा वादग्रस्त आदेश दि.२ एप्रिल २०१८ रोजी दिला होता. त्याप्रमाणे कॅमेरे लावण्यात आले होते. याप्रकरणी आक्षेप घेऊन भूषण व अपर्णा यांनी आवश्यक पुराव्यानिशी दाद मागितली होती. तसेच या उभयतांनी, न्यायाधीश हाशमी यांची कृती ही गुन्हेगारी स्वरु पात मोडणारी असल्याचा आरोप करु न, या न्यायाधिशांविरु ध्द गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती.
न्या. जोशींकडून दखल
वकिल संघटनेचे अध्यक्ष अॅड. डाबरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. याप्रकरणाची मुख्य जिल्हा न्यायाधिश विनय जोशी यांनी दखल घेऊन न्या. हाशमी यांना बोलावून घेतले होते. याचा परिणाम म्हणून न्या. हाशमी यांनी स्वत:च दिलेले आदेश शुक्रवारी मागे घेतले आहेत.