कर्जबाजारीपणामुळे अपहरण व खंडणीचा रचला बनाव; आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:45 PM2024-02-15T16:45:13+5:302024-02-15T16:46:41+5:30

तरुणाचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश.

organize kidnapping and extortion due to indebtedness in nalasopara | कर्जबाजारीपणामुळे अपहरण व खंडणीचा रचला बनाव; आरोपी अटकेत

कर्जबाजारीपणामुळे अपहरण व खंडणीचा रचला बनाव; आरोपी अटकेत

नालासोपारा (मंगेश कराळे) :- कर्ज असल्याने अपहरण व खंडणीचा बनाव केलेल्या तरुणाचा शोध घेण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी गुरुवारी दिली आहे.

अलकापूरीच्या लक्ष्मी निवास येथे राहणाऱ्या अनुप विश्वकर्मा (२८) या तरुणाचे १२ फेब्रुवारीला रात्री आरोपीने अपहरण करून जीवे ठार मारण्याची भिती घालुन १ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. अनुपचा भाऊ अनिकेतने मंगळवारी आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयाची बातमी प्राप्त होताच वरीष्ठांच्या आदेश व सुचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांचे मार्गदर्शनाखाली अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार केली. अपहरण झालेल्या तरुणासोबत कोणाचे वैर अगर त्यांचे आर्थिक व्यवहार याला अनुसरुन गुन्हयाचा प्रकार घडला आहे अगर कसे या दिशेने तपास चालू केला. 

अपहरण झालेल्या तरुणाचा शोध घेण्याचे अनुषंगाने त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे त्याचे मोबाईलचे लोकेशन हे दादर रेल्वे स्टेशन येथे असल्याचे दिसून आले. पोलीस पथक दादर येथे रवाना करुन तरुणाचे मोबाईलचे लोकेशन ट्रेस करत असताना अनुप विश्वकर्मा (२८) हा दादर रेल्चे स्टेशन येथे बसलेला मिळून आला. त्याला ताब्यात घेवून आरोपी व त्यास अपहरण केल्यानंतर डांबुन ठेवलेल्या ठिकाणांबाबत चौकशी करीत असताना त्याच्या कथनात साशंकता जाणवली. त्यानंतर त्याला विश्वासात घेवून माहीती घेतल्यावर अनुपने प्रीपेअर क्रेडीट विदया लोन यांचेकडुन गेल्या २ वर्षापुर्वी ९४ हजार रुपयांचे लोन घेतले होते. सदर लोनचे हप्ते भरणेकरीता एसडब्ल्यूओटी कन्सल्टन्सीचे रीकव्हरी एजंट राजेश शेट्टी हे त्याला वांरवार वसूलीकरीता घरपर्यंत येण्याची व मारण्याची धमकी देत होते. लोनचे पैसे फेडण्यासाठी अतुलने स्वत:चे अपहरण व खंडणीचा बनाव आखला असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सपोनि सुहास कांबळे, सागर शिंदे, सहा.फौज. रमेश भोसले, संजय नवले, पो.हवा. रविंद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदिश गोवारी, रमेश आलदर, दादा आडके, सुधीर नरळे, अमोल कोरे, मसुब/अविनाश चौधरी, सायबरचे सहा.फौज संतोष चव्हाण यांनी केली आहे.

Web Title: organize kidnapping and extortion due to indebtedness in nalasopara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.