वसईत निरोगी आरोग्याचा संदेश देणाऱ्या ख्रिसमस फिटनेस रनचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2021 06:12 PM2021-12-23T18:12:00+5:302021-12-23T18:12:21+5:30
दरम्यान कोरोना महामारीच्या मार्गदर्शक तत्वानुसार यासाठी निवडलेले काही निवडक धावपटुच यांत सहभागी होऊ शकतील व कोठेही न थांबतां ते आपली दौड पुर्ण करतील.
- आशिष राणे
वसई- यंग स्टार्स ट्रस्ट पुरस्कृत वसई तालुका कला क्रीडा विकास मंडळाने गेल्या वर्षीप्रमाणे ख्रिसमस फिटनेस रन-२०२१ चे आयोजन केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातुन सांताक्लॅाजच्या वेषातील काही निवडक मॅरॅथॉन धावपटु तंदुरूस्तीचा संदेश देणार आहेत. येत्या शनिवार दि. २५ डीसेंबर २०२१ रोजी नाताळनिमित्त सायंकाळी ठीक ४.०० वा. नानभाट चर्च येथून ही दौड सुरु होणार आहे.
दरम्यान कोरोना महामारीच्या मार्गदर्शक तत्वानुसार यासाठी निवडलेले काही निवडक धावपटुच यांत सहभागी होऊ शकतील व कोठेही न थांबतां ते आपली दौड पुर्ण करतील. नागरिकांनी सुद्धा चेहऱ्यावर मास्क लावून सुरक्षित अंतर ठेऊन गर्दी न करता आपापल्या विभागांत या ऊपक्रमाचा मनसोक्त आनंद घ्यावा असे ही आवाहन आयोजकांतर्फे सरचिटणीस प्रकाश वनमाळी यांनी केले आहे.
ख्रिसमस फिटनेस रन ची सुरवात नानभाट चर्च येथून सायं ४.०० वा. प्रमुख पाहुणे, पंकज ठाकूर, माजी उपाध्यक्ष मुंबई क्रीकेट असोसिएशन, कु. वेलरी पिटर लोबो, नंदाखाल, स्केटींग राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेती, तसेच डीॲान डॅाम्निक रुमाव, दुबई आयर्नमॅन व मार्शल लोपीस, माजी नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल असे ही सांगण्यात आले.
कसा असेल ख्रिसमस फिटनेस रनचा मार्ग-
नानभाट येथून सुरू होणारी ही दौड नाळे -वाघोली- निर्मळ -गिरिज -बंगली नाका -देवतलाव - वासळई मर्सिस -होळी बाजार, रमेदी चर्च ,पारनाका सागरशेत मुळगाव चर्च केरेपोंडे किरावली नाका वेलंकीनी माता सेंटर चोबारे कृपा फाऊंडेशन पापडी नाका पापडी चर्च तामतलाव नरवीर चिमाजी आप्पा मैदान अशा विविध मार्गावरुन मार्गस्थ होणार आहे.