पतंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी पूर्ण, अनेक कार्यक्रमांचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 02:38 AM2018-02-13T02:38:46+5:302018-02-13T02:38:53+5:30

मंगळवारच्या महाशिवरात्रीची महादेव पतंगेश्वर व इतिहासकालीन नागझरी तसेच कावळे मठ शिवमंदिरात जय्यत तयारी झाली आहे. येणा-या भाविकांत दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेऊन प्रशासनासह, पोलिस अधिकारी, मंदिर ट्रस्ट कर्मचारी व मंदिरच्या कमिटीने भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे.

Organizing the program of Mahashivratri in the Kiteshwar temple, organizing various events | पतंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी पूर्ण, अनेक कार्यक्रमांचे आयोजन

पतंगेश्वर मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी पूर्ण, अनेक कार्यक्रमांचे आयोजन

Next

विक्रमगड : मंगळवारच्या महाशिवरात्रीची महादेव पतंगेश्वर व इतिहासकालीन नागझरी तसेच कावळे मठ शिवमंदिरात जय्यत तयारी झाली आहे. येणा-या भाविकांत दरवर्षी होणारी वाढ लक्षात घेऊन प्रशासनासह, पोलिस अधिकारी, मंदिर ट्रस्ट कर्मचारी व मंदिरच्या कमिटीने भक्तांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे़ येथील शिवलिंगांचे दर्शन घेण्यासाठी असंख्य भाविक येत असतात त्यामुळे या उत्सवास जत्रेचे स्वरुप येते़ विविध भागातून वेगवेगळया वस्तूंची दुकाने, स्टाल्स लावण्यांत आले आहेत़ या शिवमंदिरांची गेल्या आठवडाभरापासून रंगरंगोटी केली जात होती ़ प्राचीन पांडवकालीन शिवमंदिर असलेल्या नागझरी स्वयंभू मंदिरात येणा-या भाविकांच्या स्वागतासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे ़तसेच शिव गोरक्षनाथ पावन मठ कावळे येथे गेले पंधरा दिवस येत असलेल्या साधूंची मंदिरातील संख्या वाढत असून त्यांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था व्यवस्थापनाकडून करण्यांत आली आहे़ या मंदिराच्या प्रवेशद्वारावर स्वागताची भव्य कमान उभारण्यात आली आहे ़ कावळे मठाचे गुरुवर्य बालकनाथजी बाबांच्या दर्शनासाठी भक्त दोन दिवसांपासुनच मोठी गर्दी करीत आहेत़ या दिवशी तालुक्यातील शिवमंदिरांना यात्रेचे स्वरुप येत आहे़ या दिवशी या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले असून त्यामध्ये पहाटेच्या महापूजेनंतर भजन किर्तन, अभिषेक होणार असून महापूजेनंतर मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यांत येणार आहे़ तसेच शिवलीलामृत पठण,पारायण आदि कार्यक्रम देखील होणार आहेत़
या दिवशी उपवास असल्याने कलिंगड, खजूर, कौट, उसाचा रस, द्राक्षे वगैरे याची मागणीही वाढली असल्याने त्यांच्या भावात वाढ झाली आहे. तसेच बेल, पांढरी फुले, हार यांचीही आवक मोठ्या प्रमाणात झाली असून त्यांचेही दर काही प्रमाणात वाढलेले आहेत.

वसईत भरगच्च कार्यक्रम
वसई : महाशिवरात्री निमित्ताने वसई विरार परिसरातील शिव मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादिवशी तुंगारेश्वर पर्वतावर पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. येथील प्राचीन शिवमंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रमांसह भंडाºयाचेही आयोजन करण्यात येते. वसईतील काही भागातून भाविक कावड यात्रा काढतात. महाशिवरात्रीला किमान लाखभर भाविक दर्शनास येतात. वालीव पोलिसांकडून दरवर्षी चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. तर एसटी आणि वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेकडून विशेष गाड्या सोडल्या जातात. याचबरोबर विरार हायवेवरील शिव मंदिर, पापडखिंड येथील प्राचीन शिव मंदिर. नारंगी टेकडीवरील शिव मंदिर, चांदीप येथील शिव मंदिर, वसई किल्ल्यातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी लोटलेली असते. सर्व मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या विरार पूर्वेकडील पाचपायरी शाखेतर्फे महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी भूपाळी, अभिषेक, आरती. रुद्र पठम, बिल्व अर्पण, विविध सेवा आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याला भाविक मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असतात.

बाळकापरा येथे जत्रेची तयारी पूर्ण
जव्हार : या तालुक्यातील बाळकापरा येथे प्राचीन शिवमंदीर असून तेथे भरणाºया जत्रेची तयारी पूर्ण झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला व आजूबाजूच्या परीसरात छोटी छोटी विविध वस्तूंची दुकाने लावण्याकरीता मंदीर ट्रस्टच्या वतीने तात्पुरते लाकडी शेड बांधण्याचे काम पूर्ण झाले होते. या जत्रेत लाखोें भाविक उपस्थित राहतात.
दर्शनासाठी पहाटे ५ वा. पासून मोठी गर्दी उसळते, लांब रांगा लागलेल्या असतात. शहरापासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी असंख्य भाविक पायी येत असतात, जत्रेमध्ये लाखोंच्या संख्येने भाविक नवस फेडतात. ते पायी येत असल्याने दुकानांतील खाद्यपदार्थांवर चांगलाच ताव मारला
जातो.

अनेक मंदिरांत अपूर्व उत्साह
वाडा : खंडेश्वरीनाका वाडा, कोंढले, नारे, अंबिस्ते, गातेस, गारगाव, घोडमाळ, पीक व तिळसे गावांमध्ये पुरातन शिवमंदिरे असून त्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. वैतरणा नदीतीरावर असणारे तीळसेश्वर हे पांडवकालीन शिवमंदिर लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असून या यासह सर्व ठिकाणी या भव्य उत्सवाची तयारी पूर्ण आहे.
तळसेश्वर हे स्वयंभू शिवलिंग असून उंच चबुतºयावर वसलेले सुंदर मंदिर आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील जलाशयातील मोठे मासे. या शहरातील खंडेश्वरीनाक्यावरील शिवमंदिर देखील पांडवकालीन आहे. अंबिस्ते येथील नागनाथ, गारगाव येथील धाकेदा, नारे, घोडमाळ, कोंढले येथील मंदिरात भाविकांची गर्दी असते. मात्र कावळे येथे असलेल्या मंदिरात भाविक सर्वात जास्त गर्दी करतात. वाडा ते तिळसे येथे अशी जादा बससेवादेखील या दरम्यान सुरू असते.

Web Title: Organizing the program of Mahashivratri in the Kiteshwar temple, organizing various events

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.