महापौर मॅरेथॉन गावाबाहेरूनच

By admin | Published: September 24, 2016 02:54 AM2016-09-24T02:54:03+5:302016-09-24T02:54:03+5:30

यंदाची सहावी वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा येत्या ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Out of the Mayor Marathon Village | महापौर मॅरेथॉन गावाबाहेरूनच

महापौर मॅरेथॉन गावाबाहेरूनच

Next


वसई : यंदाची सहावी वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धा येत्या ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. मागच्या वर्षीचा विरोध लक्षात घेऊन वाद टाळण्यासाठी यंदा वसईतील गावांच्या बाहेरूनच स्पर्धेचा मार्ग ठेवण्यात आला आहे. १ हजारांहून अधिक व्यावसायिक आणि हौशी स्पर्धकांचा समावेश असलेल्या स्पर्धेत यावर्षी १८ हजारांहून अधिक स्पर्धक सहभाही होतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. यंदा ३५ लाखांहून अधिक बक्षिसे दिली जाणार आहेत. तर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील धावपटू यंदाही वसईत धावताना पहावयास मिळणार आहेत.
वसई विरार महापौर मॅरेथॉनचे यंदाचे सहावे वर्ष असून यंदा मोठमोठ्या आयोजकांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. मागच्या वर्षी आयत्यावेळी गावातून विरोध झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर शेवटच्या वेळी स्पर्धेचा मार्ग बदलण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी गावांतून जाणारा मार्ग न ठेवता गेल्यावर्षी प्रमाणेच शहरांतूनच मार्ग ठेऊन वाद टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महापौर प्रवीणा ठाकूर यांच्या उपस्थितीत विरार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी आमदार क्षितीज ठाकूर, आयु्नत सतीश लोखंडे, माजी महापौर राजीव पाटील, स्थायी समिती सभापती नितीन राऊत, सभागृह नेते फ्रान्सिस डिसोजा उपस्थित होते.
पुरुष पूर्ण मॅरेथॉनच्या विजेत्याला अडीत लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे. महिला व पुरुष अर्ध मॅरेथॉन विजेत्यास सव्वा लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. वसईतील विजेत्यांना खास बक्षिसे दिली जाणार आहेत. बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांची वाहतूक, निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्पर्धकांना टाईमिंग चीप, रनिंग नंबर, फिनिशर मेडल्स, रेस फी फोटोग्राफ्स, ब्रेकफास्ट दिला जाणार आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या मार्गावर वॉटर स्टेशन, एनर्जी ड्रिंक्स स्टेशन, कुल स्पंजींग, आॅरेंज स्टेशन, मेडिकल बेस कॅम्प, मेडिकल स्टेशन आणि दुचाकीवर डॉ्नटर व्यवस्था आणि रुग्णवाहिकेची सोय करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
>खेळाडूंची आॅनलाइन नोंदणी सुरू
राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा ४२ किलोमीटर, २१ किलोमीटर तसेच ११ किलोमीटर स्त्री आणि पुरूष खुल्या गटात होणार आहे. या शिवाय पालघर जिल्ह्यातील १८ वर्षाखालील स्पर्धाकांसाठीही स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या वर्षी या मॅरेथॉन स्पर्धेत १४ हजार स्पर्धक सहभागी झाले होते. दुसऱ्याच वर्षी या मॅरेथॉनला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाल्याची माहिती महापौर ठाकूर यांनी दिली. या वर्षी १८ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेतील राष्ट्रीय खेळाडूंची आॅनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. इतर स्पर्धकांसाठी प्रवेश अर्ज पालिका मुख्यालयातून १५ आॅक्टोबर पासून वितरीत करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. शालेय गटासाठी १ नोव्हेंबर पासून अर्ज देण्यात येणार आहेत. मॅरेथॉन पूर्वी शहरातील सर्व रस्त्याांची डागडुजी पूर्ण करून धावपटूंची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षात घेतली जाईल, आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.
>१ हजार व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग
यंदाच्या स्पर्धेत १ हजार व्यावसायिक आणि हौशी खेळांडूंसह देशातील १८ हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होतील. तर अनेक मोठ्या कंपन्या आयोजक म्हणून सहभागी झाल्या आहेत. यशस्वी स्पर्धकांना ३५ लाखांहून अधिकची बक्षिसे दिली जाणार आहेत, अशी माहिती महापौर ठाकूर यांनी दिली. स्त्री भ्रूण हत्या टाळा व निसर्गाचा समतोल पाळा आणि क्लीन वसई, ग्रीन वसई हा संदेश स्पधेतून दिला जाणार आहे, असेही महापौर ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Out of the Mayor Marathon Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.