अपंगत्वावर मात करत ‘त्याने’ निर्माण केले स्वत:चे विश्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:19 AM2019-11-10T00:19:13+5:302019-11-10T00:19:19+5:30

जन्मत: व्यंग हा माणसाचा कमकुवतपणा ठरत नाही.

Overcoming disability, he created his own universe | अपंगत्वावर मात करत ‘त्याने’ निर्माण केले स्वत:चे विश्व

अपंगत्वावर मात करत ‘त्याने’ निर्माण केले स्वत:चे विश्व

googlenewsNext

पारोळ : जन्मत: व्यंग हा माणसाचा कमकुवतपणा ठरत नाही. उलट आपल्या जिद्द, मेहनतीच्या जोरावर कुणाकडे दयेची भीक न मागता आपले विश्व उभे करू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे विरारचा मोहनसिंग तो आज खरा बाहुबली आहे.
अपंग व्यक्ती म्हटली की अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. मात्र विरार येथील २५ वर्षीय मोहनसिंग ठाकूर याने अपंगात्वावर विजय मिळवत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला. आयुष्यातील विविध संकटांचा सामना करत स्वाभिमानाने आयुष्य जगणाऱ्या मोहनची जिद्द नक्कीच प्रेरणादायी आहे.
देवाने जन्मत:च शारीरिक व्यंग दिले. मात्र खचून न जाता जगण्यासाठी धडपड करणारा मोहनसिंग हा सध्या दिव्यांगांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. तो एका हाताने खोल विहिरीत पोहतो, एका हाताने उंच नारळाच्या झाडावरही चढतो, नारळही एका मिनिटात सोलतो. इतकेच नव्हे तर वजनदार बुलेटही लिलया चालवतो.
जन्मताच मोहनसिंग याचा एक हात अधू आहे. मात्र आपल्या अपंगत्वाचा बाऊ न करता त्याने आपल्या उपजीविकेचा मार्ग स्वत:च शोधून काढला आहे.
मोहनसिंगचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या तो एका तबेला मालकाकडे काम करतो. त्याचे लग्नही झाले असून त्याला दोन मुले आहेत.
>मोहनसिंगला मराठी, हिंदी, तोडकी मोडकी इंग्रजी, भोजपुरी, गुजराती , मल्याळम या भाषेत तो कोणाशीही संवाद साधू शकतो. धडधाकट माणसेही कामधंदा न करता भीक मागतात, मात्र मोहनसिंग कुणावरही अवलंबून नाही.

Web Title: Overcoming disability, he created his own universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.