पालघर जि.प.च्या १२ कर्मचा-यांना काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:29 AM2017-07-29T01:29:41+5:302017-07-29T01:29:41+5:30
या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी २ वर्षाहून अधिक काळ आपापल्या विभागांना न कळवता गैरहजर राहिलेल्या १२ कर्मचाº्याना जिल्हा परिषदेच्या सेवेतून काढून टाकले
पालघर: या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी २ वर्षाहून अधिक काळ आपापल्या विभागांना न कळवता गैरहजर राहिलेल्या १२ कर्मचाº्याना जिल्हा परिषदेच्या सेवेतून काढून टाकले असून आणखी 30 कर्मचाºयांविरु द्धची कारवाई प्रस्तावित केली आहे.
ही कारवाई महाराष्ट्र नागरी सेवा (अनुशासन व अपील) नियम १९९७ अंतर्गत करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या नोकरीवर कुºहाड पडणार असल्याने कर्मचाº्याना धक्का बसला आहे. यातील ९ जण हे जिल्ह्यातील विविध भागातील शिक्षक आहेत तर २ कर्मचारी आरोग्य विभागात शिपाई म्हणून काम करीत होते.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन, शिक्षण व अन्य विभागात रिक्त स्थाने अद्ययावत करताना जिल्हा परिषदेचे ४० कर्मचारी २ वर्षांहून अधिक काळ गैरहजर असल्याचे आढळले.यामधील डहाणू येथील एक शिक्षक २० वर्षाहून अधिक काळ गैरहजर असल्याचे दिसून आले आहे.या सर्व कर्मचाº्याना त्यांच्या त्या त्या विभागामार्फत गैरहजर असल्यासंबंधी नोटिसा बजविण्यात आल्या होत्या व अलीकडे जिल्हा परिषदेने त्यांना हजर होण्यासाठी वर्तमान पत्रातून जाहीर सूचनाही दिली होती.मात्र तरीही ते हजर झाले नाही.