‘पाडाळे’बाधितांचा भाजपावर बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:26 AM2017-12-05T00:26:19+5:302017-12-05T00:26:29+5:30
पाडाळे धरणाच्या कॅनॉलच्या बांधकामात पाच गावांतील शेतकºयांच्या जमिनी संपादित न करता कालवा खोदून त्या हस्तांतरित केल्या.
मुरबाड : पाडाळे धरणाच्या कॅनॉलच्या बांधकामात पाच गावांतील शेतकºयांच्या जमिनी संपादित न करता कालवा खोदून त्या हस्तांतरित केल्या. ठेकेदाराला पोसण्यासाठी शेतकºयांना वाºयावर सोडल्याने या बाधित शेतकºयांनी जि.प. आणि पं.स. निवडणुकांत भाजपावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय बाधित शेतकरी गुरुनाथ पष्टे तसेच माजी सरपंच तानाजी पष्टे यांनी देत याचा फटका या गटातील भाजपा उमेदवारांना चांगलाच बसण्याची शक्यता आहे.
पाडाळे धरणाच्या कॅनॉलच्या बांधकामासाठी पाडाळे, ठुणे, माजगाव, मानिवली, नांदगाव या पाच गावांतील १६२ शेतकºयांच्या जमिनींचे पाटबंधारे विभागाने कायदेशीर भूसंपादन न करता कालवा खोदून जमिनी हस्तांतरित केल्या. दीड वर्षापासून कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर मेळावे, आंदोलने, उपोषण करूनदेखील मोबदला मिळाला नाही. आ. किसन कथोरे ठेकेदाराची पाठराखण करत असल्याने स्थानिक शेतकºयांना वाºयावर सोडून देत ठेकेदाराची पाठराखण करणाºया भाजपाला मतदान न करण्याचा निर्णय या बाधित शेतकºयांनी घेतला
आहे.
याचा फटका सरळगाव जिल्हा परिषद विभागातील आणि पंचायत समिती गणातील उमेदवारांना बसणार
आहे. आमदार-खासदार
असलेल्या पक्षाला उमेदवार मिळत नसल्याने बाहेरील (अंबरनाथ) येथील तसेच दलबदलू उमेदवारांना उमेदवारी देण्याची नामुश्की भाजपावर ओढवली आहे. त्यातच, आता शेतकºयांच्या या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे.